2 May 2025 10:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

Mutual Fund SIP | पत्नीच्या नावाने या योजनेत गुंतवणूक करा, दर महिन्याला 1 लाख रुपये व्याज मिळेल, योजना जाणून घ्या

Mutual fund

Mutual Fund SIP | कोणी व्यापार धंदा करणारी व्यक्ती असो किंवा खाजगी नोकरी, किंवा कोणी सरकारी नोकरी करणारी व्यक्ती असो, प्रत्येकालाच आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आर्थिक भविष्याची काळजी असते. सरकारी नोकऱ्यांमध्ये 2004 नंतर झालेल्या बदलानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारी पेन्शन तरतूद रद्द करण्यात आली. अशा परिस्थितीत तुम्ही निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन करणे खूप आवश्यक आहे. निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन करण्यासाठी आता पासूनच गुंतवणूक करणे शहाणपणाचे ठरेल.

तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावावर दर महिन्याला पैसे गुंतवणूक करू शकता. वाढती महागाई आणि दिवसेंदिवस वाढणारी किंमत, त्यामुळे निवृत्तीनंतर महिन्याला किमान एक लाख रुपये किंवा थोडी फार उत्पन्नाची व्यवस्था करणे खूप गरजेचे आहे. निवृत्तीनंतर, 1 लाख रुपयांच्या उत्पन्नासह उदरनिर्वाह करण्यासाठी पत्नीच्या नावावर दरमहा काही पैसे जमा करणे सुरू केले तर तुम्हाला दीर्घकाळ नंतर जबरदस्त परतावा मिळेल.

बँकांचा सरासरी व्याजदर 5 टक्के :
सध्या बँकांचा व्याजदर सर्वात किमान पातळीवर चालू आहे. बँकांचा सरासरी व्याजदर 5 टक्के च्या जवळपास आहे. नजीकच्या भविष्यात ते आणखी कमी होण्याची शक्यता दिसत नाही. यानुसार, तुमच्याकडे दरमहा जर 1 लाख रुपये व्याज कमवण्यासाठी तुमच्याकडे 2.40 कोटींचा रुपये असणे आवश्यक आहे, तर त्यावर तुम्ही चांगला व्याज परतावा मिळवू शकता. निवृत्तीच्या एवढे पैसे जमा करण्यासाठी, तुम्हाला म्युचुअल फंड SIP हा बेस्ट गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध आहे.

म्युचुअल फंड 15 टक्के सरासरी परतावा :
समजा सध्या तुम्ही 30 वर्षांचे आहात. त्यामुळे तुमची जर पत्नीच्या नावावर महिन्याला किमान 3500 रुपयांची म्युचुअल फंड SIP गुंतवणूक सुरू करता, तर मागील 10 वर्षांची आकडेवारी पाहता, अनेक SIP फंडने सरासरी 15 टक्के पेक्षा जास्त परतावा दिला आहे. हा परतावा आधार म्हणून घेऊन आपण तुमचा भविष्यातील परतावा मोजू.

दरमहा 3500 रुपयांची गुंतवणूक :
30 वर्षे जर तुम्ही दरमहा 3500 रुपये गुंतवणूक करता, तर तुम्ही तीस वर्षात एकूण 12.60 लाख रुपये गुंतवता. यावर, जर तुम्हाला दरवर्षी सरासरी चक्रवाढ पद्धतीने 15 टक्के व्याज परतावा मिळत असेल, तर 30 वर्षे पूर्ण झाल्यावर ही तुम्हाला मिळणारी परतावा रक्कम 2 कोटी 45 ​​लाख रुपये असेल. या रकमेवर तुम्हाला वार्षिक 5 टक्के व्याज जा हिशोबाने दरमहा 1 लाखा रुपयेपेक्षा जास्त व्याज मिळेल.

परताव्याच्या आधारावर 10 वर्षांत सर्वोत्कृष्ट परतावा देणारे म्युच्युअल फंड आणि त्यांचा परतावा
1) एसबीआय स्मॉल कॅप म्युच्युअल फंड : 20.04 टक्के वार्षिक परतावा
2) निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजना : 18.14 टक्के वार्षिक परतावा
3) इन्वेस्को इंडिया मिडकॅप म्युच्युअल फंड योजना : 16.54 टक्के वार्षिक परतावा
4) कोटक इमर्जिंग इक्विटी म्युच्युअल फंड योजना : 15.9 टक्के वार्षिक परतावा

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Mutual Fund SIP returns on investment for long term benefits on 03 April 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

mutual fund(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या