13 December 2024 6:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

NDR Auto Components Share Price | अजून काय हवं? या शेअरने मल्टिबॅगर परतावा प्लस फ्री बोनस शेअर्स आणि डिव्हीडंड फायदा, स्टॉक डिटेल्स पाहा

Highlights:

  • NDR Auto Components Share Price
  • एनडीआर ऑटो कॉम्पोनंट्स शेअरचा लाभांश तपशील
  • बोनस शेअर्स तपशील
  • मागील एका वर्षात या 92.40 टक्के परतावा
NDR Auto Components Share Price

NDR Auto Components Share Price | ‘एनडीआर ऑटो कॉम्पोनंट्स’ या स्मॉल कॅप कंपनीने आपल्या शेअर धारकांना दुहेरी लाभ देण्याची घोषणा केली आहे. कंपनी शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स आणि लाभांश वाटप करणार आहे. ही बातमी येताच गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात स्टॉक खरेदीला सुरुवात केली.

सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एनडीआर ऑटो कॉम्पोनंट्स कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह 813.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज मंगळवार दिनांक 30 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.88 टक्के घसरणीसह 794.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

एनडीआर ऑटो कॉम्पोनंट्स शेअरचा लाभांश तपशील

सेबीला दिलेल्या माहितीत एनडीआर ऑटो कॉम्पोनंट्स कंपनीने कळवले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाने 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या एका शेअरवर 50 टक्के लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच पात्र गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर 5 रुपये लाभांश दिला जाणार आहे. कंपनीने अद्याप लाभांश वाटपाची रेकॉर्ड डेट जाहीर केलेली नाही. या सोबत कंपनीने शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.

बोनस शेअर्स तपशील

एनडीआर ऑटो कॉम्पोनंट्स कंपनीने आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी आपल्या 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरवर एक शेअर मोफत देणार आहे. बोनस इश्यूची रेकॉर्ड तारीख म्हणून 12 जुलै 2023 हा दिवस जाहीर करण्यात आला आहे. एनडीआर ऑटो कंपोनेंट्स कंपनीच्या प्रवर्तक गटाकडे एकूण 73.95 टक्के भाग भांडवल आहेत. आणि सार्वजनिक गुंतवणूकदारांकडे एकूण 26.06 टक्के भाग भांडवल आहे.

मागील एका वर्षात या 92.40 टक्के परतावा

मागील 1 वर्षात एनडीआर ऑटो कॉम्पोनंट्स कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. मागील एका वर्षात या स्टॉकमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना 92.40 टक्के परतावा मिळाला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने लोकांना 32.43 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 813.70 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 300.65 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | NDR Auto Components Share Price today on 30 May 2023.

हॅशटॅग्स

NDR Auto Components Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x