 
						Nippon India Mutual Fund | नुकताच काही म्युच्युअल फंड योजनांनी 21 वर्षे पूर्ण केली आहेत. या योजनांचा परतावा देण्याचा ट्रॅक रेकॉर्ड जबरदस्त आहे. एकवेळ गुंतवणूक असो किंवा SIP पद्धत, दोन्ही प्रकारे या योजनांनी गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिला आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला तीन योजनांची माहिती देणार आहोत ज्यांनी नुकताच 21 वर्षे पूर्ण केली आहेत.
या योजनांनी लाँच झाल्यापासून, एकरकमी गुंतवणुकीवर वार्षिक 21.21 टक्के परतावा दिला आहे. तर SIP गुंतवणुकीवर वार्षिक 18 टक्के परतावा दिला आहे. ज्या लोकांनी या योजनांमध्ये 10,000 रुपये मासिक SIP गुंतवणूक केली होती त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 1.5 ते 2 कोटी रुपये झाले आहे.
निप्पॉन इंडिया बँकिंग अँड फायनान्स सर्विस फंड
* 21 वर्षात फंडाचा SIP परतावा : 17.6 टक्के वार्षिक
* मासिक SIP : 10,000 रुपये
* एकूण गुंतवणूक 21 वर्षात : 25,20,000 रुपये
* SIP चे एकूण मूल्य 21 वर्षात : 2,16,97,205 रुपये
निप्पॉन इंडिया बँकिंग आणि फायनान्शिअल सर्व्हिसेस फंड ही योजना 26 मे 2003 रोजी सुरू झाली होती. या फंडाची AUM 6138 कोटी रुपये आहे. या योजनेने लाँच झाल्यापासून आपल्या गुंतवणूकदारांना एकरकमी गुंतवणुकीवर वार्षिक 21.21 टक्के परतावा दिला आहे.
बडोदा बीएनपी परिबस मल्टीकॅप फंड
* 21 वर्षात फंडाचा SIP परतावा : 15.41 टक्के वार्षिक
* मासिक SIP : 10,000 रुपये
* एकूण गुंतवणूक 21 वर्षात : 25,20,000 रुपये
* SIP चे एकूण मूल्य 21 वर्षात : 1,62,33,295 रुपये
लॉन्च झाल्यापासून या योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिला आहे. या योजनेने सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे मासिक 10,000 रुपये गुंतवणुकीवर 21 वर्षात 2.16 कोटी रुपये परतावा दिला आहे. या म्युच्युअल फंडाच्या खर्चाचे प्रमाण 1.88 टक्के आहे.
कॅनरा रोबेको फ्लेक्सी कॅप फंड
* 21 वर्षात फंडाचा SIP परतावा : 16.32 टक्के वार्षिक
* मासिक SIP : 10,000 रुपये
* एकूण गुंतवणूक 21 वर्षात : 25,20,000 रुपये
* SIP चे एकूण मूल्य 21 वर्षात : 1,83,14,546 रुपये
कॅनरा रोबेको फ्लेक्सी कॅप फंड 16 सप्टेंबर 2003 रोजी सुरू झाला होता. नुकताच या योजनेला 21 वर्षे पूर्ण झाली आहेत. या फंडाचा AUM 13,510 कोटी रुपये आहे. लाँच झाल्यापासून या योजनेने एकरकमी गुंतवणुकीवर बार्शी 18.40 टक्के परतावा दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		