
Quant Mutual Fund | जर तुमचे गुंतवणुकीचे उद्दिष्ट कमीत कमी 5 वर्षे असेल तर हे फंड चांगले पर्याय आहेत. गेल्या 5 वर्षांचा परताव्याचा आलेख पाहिला तर हे विधान खरे ठरते. अशा अनेक मिडकॅप म्युच्युअल फंड योजना आहेत ज्यात एकरकमी आणि एसआयपीवरील परतावा ५ वर्षांत २७ टक्के ते ३८ टक्क्यांदरम्यान राहिला आहे. एकरकमी गुंतवणुकीमुळे गुंतवणूकदारांचे पैसे ५ वर्षांत ४ पटीने वाढले आहेत.
मिड-कॅप फंड उच्च परतावा देण्यासाठी ओळखले जातात, कारण चांगल्या मॅक्रो वातावरणामुळे मिड-कॅप शेअर्समध्ये चांगली गती येते. यामुळे मिडकॅप शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या इक्विटी मिड कॅप फंडांचा परतावा वाढतो. लार्ज कॅप म्युच्युअल फंडांच्या तुलनेत मिडकॅप म्युच्युअल फंड सामान्यत: चांगला परतावा देतात.
इक्विटी फंड श्रेणीचा भाग असल्याने ते लार्ज कॅप म्युच्युअल फंडांपेक्षा थोडे जोखमीचे असतात, परंतु बाजाराची परिस्थिती अनुकूल असेल तर ते बर्याचदा लार्ज कॅप फंडांपेक्षा चांगला परतावा देतात. हे फंड पोर्टफोलिओमध्ये बॅलन्स प्रदान करतात.
Quant Mid Cap Fund
* 5 वर्षांचा वार्षिक एकरकमी परतावा : 32.69%
* एकूण गुंतवणूक : 1 लाख रुपये
* 5 वर्षातील एकूण निधी : 4,11,330.55 रुपये (4.11 लाख रुपये)
* एकूण नफा : 3,11,330.55 रुपये (3.11 लाख रुपये)
* 5 वर्षांचा वार्षिक एसआयपी परतावा : 31.09%
* मासिक एसआयपी गुंतवणूक : 10,000 रुपये
* 5 वर्षात एकूण एसआयपी रक्कम : 600,000 रुपये
* 5 वर्षानंतर एसआयपीचे एकूण मूल्य : 1,287,093 रुपये
* फंड लाँच करण्याची तारीख : 1 जानेवारी 2013
* लाँचिंगपासून परतावा : 18.74 टक्के वार्षिक
* फंडाची एकूण AUM: 889.1 करोड रुपये (31 डिसेंबर, 2024)
* खर्च गुणोत्तर: 0.59% (31 दिसंबर, 2024)
* किमान एकरकमी गुंतवणूक : 5000 रुपये
* किमान एसआयपी गुंतवणूक: 1000 रुपये
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.