27 November 2022 5:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
OnePlus 11 5G Smartphone | लाँचिंगपूर्वी वनप्लस 11 स्मार्टफोनची माहिती लीक, फीचर्स आणि किंमत पहा Google Messages | गुगल शॉर्ट्सने इन्स्ट्राग्रामचा बँड वाजवल्यानंतर व्हॉट्सॲपचा बँड वाजवणार गुगल मेसेजेस? Bhediya Day Box Office | भेडिया सिनेमाची धमाकेदार कमाई, प्रेक्षकांच्या प्रतिसादाने कलेक्शन जोमात Business Idea | 1 लाख मासिक उत्पन्नासाठी सुरू करा हा व्यवसाय, सरकारकडून 35 टक्के अनुदान देईल, प्रोजेक्ट डिटेल्स Airtel Jio 5G | देशातील कोणत्या शहरांमध्ये उपलब्ध आहे 5G सेवा, पाहा संपूर्ण यादी, तुमचं शहर आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानावर शिंदेचं दुर्लक्ष, पण कंटेनर भरून खोके दिले अशा वायफळ प्रतिक्रियांसाठी प्रचंड वेळ? Drishyam 2 Box Office | अजय देवगनच्या सिनेमाने मोडले अनेक रेकॉर्ड्स, शनिवारी मोठी कमाई, किती कलेक्शन?
x

SBI Mutual Fund | एसबीआय म्युच्युअल फंडाची ही योजना कोटीत परतावा देत आहे, 9 पटीने पैसा वाढतोय, योजनेचं नाव सेव्ह करा

SBI mutual fund

SBI mutual Fund | जेव्हा आपण गुंतवणुकीचा विचार करतो,तेव्हा सर्वात आधी आपल्या मनात पोस्ट ऑफिस स्कीम, एलआयसी, बँकेच्या फिक्स्ड डिपॉझिट स्कीमचा विचार येतो. परंतु या योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही हवा तेव्हा जास्त नफा कमवू शकत नाही. वरील सर्व योजना तुम्हाला थोड्या फार प्रमाणात परतावा मिळवून देतील पण तो पुरेसा नसेल. जर तुम्हाला मोठा परतावा कमवायचा असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा विचार केला पाहिजे.

म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या जबरदस्त वाढत आहे. लोक म्युचुअल फंड मध्ये SIP च्या माध्यमातून गुंतवणूक करत आहेत, आणि भरघोस परतावाही कमवत आहेत. तुम्हालाही कमी काळात अनेक पटींनी परतावा कमवायचा असेल तर SBI च्या म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करा. SBI म्युच्युअल फंड योजना भरघोस नफा कमावून देतात, त्यामुळे आता SIP योजना लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत चालले आहे. भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणून प्रसिद्ध असलेली SBI बँक आपल्या ग्राहकांना म्युच्युअल फंड SIP गुंतवणूक करण्याचीही सुविधा देते.

SIP वर मिळतो 9 पट परतावा :
SBI म्युच्युअल फंड SIP च्या माध्यमातून लोकांनी 10 वर्ष गुंतवणूक करून 10 पट अधिक परतावा कमवला आहे. SBI बँक आपल्या ग्राहकांसाठी SBI स्मॉल कॅप फंड या नावाने गुंतवणूक योजना चालवते. यामध्ये तुम्ही स्मॉल कॅप, मीडियम कॅप आणि लार्ज कॅप म्युच्युअल फंडांमध्ये छोटी रक्कम जमा करून गुंतवणूक सुरू करू शकता. ही म्युचुअल फंड योजना तुम्हाला फक्त 10 वर्षांच्या करोडपती बनवेल. SBI Small Cap Fund ने आपल्या गुंतवणूकदारांना 10 वर्षाच्या गुंतवणुकीवर 9 पट अधिक परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही या योजनेत 9 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर 10 वर्षांत तुमच्या कडे 1 कोटी रुपयांचा निधी तयार झाला असता.

SBI Small Cap mutual Fund :
या योजनेत तुम्ही एकरकमी किंवा SIP या दोन्ही पद्धतीने गुंतवणूक करू शकता. दर महिन्याला 500 रुपये ते 5000 रुपये SIP पद्धतीने गुंतवणूक करून तुम्ही दीर्घकाळात मोठा परतावा कमवू शकता. SBI फोकस्ड इक्विटी फंड योजना आपल्या गुंतवणूकदारांना वार्षिक 18 टक्के परतावा मिळवून देते. जर दहा वर्षापूर्वी तुम्ही या योजनेत दर महिन्याला फत 500 रुपयांची SIP गुंतवणूक केली असती, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य आता वाढून 5.28 लाख रुपये झाले असते. त्याच वेळी जर तुम्ही दर महिन्याला फक्त.5,000 रुपयांची SIP गुंतवणूक केली असती, तर दहा वर्षात तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 15.5 लाख रुपये झाले असते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| SBI mutual fund SIP scheme for huge returns on investment on 1 October 2022.

हॅशटॅग्स

SBI mutual fund(19)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x