
SBI Mutual Fund | सध्याच्या या महागाईच्या काळात प्रत्येक व्यक्ती पैशांची कोणत्या बाजूने बचत होईल हा विचार करत असतो. कारण की नोकरीला असताना बचत केली तरच भविष्यात तुम्हाला पैशांशी कोणतीही उणीव भासणार नाही. याबाबतीत एसबीआयच्या ब्ल्यूचिप फंडाने कमाल केली आहे.
‘एसबीआय ब्ल्यू चिप फंड’ हा एक लार्जकॅप फंडामध्ये मोडतो. म्हणजेच हा फंड मोठमोठ्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवतो आणि गुंतवणूकदारांना मजबूत परतावा मिळवून देतो. तसं पाहायला गेलं तर शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीची प्रचंड रिस्क घ्यावी लागते. त्यामानाने एसबीआयचा ब्ल्यूचीप फंड कमी रिस्क गुंतवणुकीचा एक जबरदस्त पर्याय ठरला आहे.
30,36,592 रुपयांपर्यंत परतावा मिळेल
एसआयपी इन्व्हेस्टमेंट गुंतवणूकदारांना वार्षिक आधारावर 12% परतावा मिळवून देते. त्यामानाने तुम्ही एसबीआयच्या या फंडामध्ये प्रत्येक महिन्याला 4000 रुपयांची गुंतवणूक करत असाल तर 20 वर्षांमध्ये एकूण रक्कम 9 लाख 60000 तयार होईल. याला कंपाऊंडिंगची जोड मिळाली तर, हा फंड 30,36,592 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.
एसबीआयच्या या फंडामध्ये पैसे गुंतवल्याने तुम्हाला व्याजावर इंटरेस्टचा फायदा मिळतो. त्याचबरोबर इंटरेस्ट आणि कंपाऊंडिंग व्याजाचा फायदा मिळाल्याने गुंतवणूकदारांसाठी हा एसबीआयचा फंड लोकप्रिय फंडा ठरला आहे.
SIP चा फायदा :
एसबीआयचा फंड असो किंवा इतर कोणताही म्युच्युअल फंड असो तुम्ही एसआयपी करत असाल तर, तुम्हाला एक फायदा अनुभवायला मिळतो तो म्हणजे SIP च्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या बजेटनुसार गुंतवणूक करण्याची संधी मिळते. त्यामुळे ज्या व्यक्तींना प्रत्येक महिन्याला पगारातील एक ठराविक रक्कम एखाद्या म्युच्युअल फंडात गुंतवायची असेल तर त्या व्यक्तींसाठी एसआयपी हा पर्याय अत्यंत फायद्याचा ठरतो.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.