SBI Mutual Fund | पगारदारांनो बिनधास्त गुंतवणूक करा, महिना SIP वर मिळेल 1 कोटी 25 लाख रुपये परतावा

SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड बाजारात गुंतवणूकदारांचा सहभाग दिवसेंदिवस वाढत आहे. म्युच्युअल फंड, विशेषत: इक्विटी म्युच्युअल फंडांकडे गुंतवणूकदारांचे आकर्षण वाढत असून इक्विटी योजना गुंतवणुकीसाठी त्यांची पहिली पसंती ठरत आहेत.

म्युच्युअल फंडांमध्ये सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) देखील अधिक लोकप्रिय होत आहे, जिथे गुंतवणूकदार रक्कम एकत्र ठेवण्याऐवजी मासिक आधारावर वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये गुंतवणूक करू शकतात. असाच एक मजबूत परतावा देणारी एसबीआय म्युच्युअल फंडाची योजना गुंतवणूकदारांना मालामाल करतेय. त्या एसबीआय म्युच्युअल फंडाच्या योजनेबद्दल जाणून घ्या.

SBI Small Cap Fund

SIP गुंतवणुकीवर फंडाने किती परतावा दिला

* 15 वर्षात एसआयपी परतावा : 23.07% वार्षिक
* मासिक एसआयपी रक्कम: 10,000 रुपये
* 15 वर्षातील एकूण गुंतवणूक : 18,00,000 रुपये
* 15 वर्षांनंतर एसआयपीचे एकूण मूल्य : 1,25,34,658 रुपये

एकरकमी गुंतवणुकीवर फंडाने किती परतावा दिला

* 15 वर्षांवरील एकरकमी गुंतवणुकीचा परतावा : 20.65 टक्के वार्षिक
* एकरकमी गुंतवणूक : 1 लाख रुपये
* 15 वर्षात 1 लाखांची किंमत : 16,70,744 रुपये (16.71 लाख रुपये)
* एकूण नफा : 15,70,744 रुपये (15.71 लाख रुपये)

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | SBI Mutual Fund Thursday 26 December 2024 Marathi News.