
SBI Mutual Fund | एसबीआय म्युच्युअल फंडाची योजना असलेल्या एसबीआय मॅग्नम चिल्ड्रन्स बेनिफिट फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. गेल्या 1 वर्षात या फंडाने 38 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे, तर गेल्या साडेचार वर्षांत गुंतवलेल्या रकमेत 4 पटीने वाढ झाली आहे. तर, गेल्या 3 वर्षात या योजनेचा सरासरी वार्षिक परतावा 23.53% राहिला आहे. मुलांच्या भवितव्यासाठी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा फंड उत्तम पर्याय ठरू शकतो. परंतु यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी या फंडाशी संबंधित जोखीम समजून घेणेही गरजेचे आहे.
एसबीआय मॅग्नम चिल्ड्रन्स बेनिफिट फंडाचे उद्दिष्ट
एसबीआय मॅग्नम चिल्ड्रन्स बेनिफिट फंड हा एक आक्रमक हायब्रीड फंड आहे ज्याचे उद्दिष्ट दीर्घकालीन भांडवली वृद्धी साध्य करणे आहे. हा फंड प्रामुख्याने इक्विटी आणि इक्विटी लिंक्ड सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करतो, ज्यामुळे दीर्घकालीन परतावा मिळण्याची शक्यता वाढते. त्याचबरोबर स्थिर उत्पन्न मिळवण्यासाठी फंड डेट आणि मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्समध्येही गुंतवणूक करतो.
योजनेची अलीकडील कामगिरी
* 1 वर्षाचा परतावा : 38.19% (रेग्युलर प्लॅन)
* 3 वर्षांचा सरासरी वार्षिक परतावा (CAGR): 23.53% (रेग्युलर प्लॅन)
गुंतवणूक कशी वाढतेय
जर एखाद्या गुंतवणूकदाराने लाँचिंगच्या दिवशी म्हणजेच 29 सप्टेंबर 2020 रोजी या योजनेत 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज त्याची फंड व्हॅल्यू 4,29,060 रुपयांच्या आसपास असती.
एसबीआय मॅग्नम चिल्ड्रन्स बेनिफिट फंडाचा बेंचमार्क इंडेक्स म्हणजे क्रिसिल हायब्रिड 35+65 ऍग्रेसिव्ह इंडेक्स, ज्याने 1 वर्षात केवळ 12.77% परतावा दिला, तर फंडाने त्यापेक्षा कित्येक पट जास्त परतावा दिला आहे.
गुंतवणुकीची पद्धत आणि किमान गुंतवणूक
एसबीआय मॅग्नम चिल्ड्रन्स बेनिफिट फंडात एकरकमी आणि सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) अशा दोन्ही पद्धतीने गुंतवणूक करता येते. जर तुम्हाला एसआयपीद्वारे गुंतवणूक करायची असेल तर डेली एसआयपीसाठी किमान गुंतवणूक 500 रुपये, मासिक एसआयपीसाठी 1,000 रुपये आणि तिमाही एसआयपीसाठी 1,500 रुपये आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.