29 March 2024 9:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 30 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर?
x

Short Term Investment | कमी वेळेत पैसा अनेक पट वाढवायचा आहे? हे गुंतवणूक पर्याय तुम्हाला मालामाल बनवतील

Short term investment

Short term Investment | आजकाल आपल्या सर्वांना कमी काळात, कमी पैसे गुंतवून श्रीमंत व्हायचे असते. श्रीमंत होण्यासाठीही खूप मेहनत आणि संयम लागते. कमी वेळेत जास्त परतावा मिळाला तर आपण सर्व नक्कीच खुश होणार. योग्य ठिकाणी योग्य रक्कम गुंतवणुक करून कमी कालावधीत भरघोस पैसे कमावता येतात. तुम्हालाही कमी वेळेत जास्त पैसे कमवायचे असतील तर आज या लेखात आम्ही तुम्हाला काही जबरदस्त योजनांची माहिती देणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही कमी वेळेत गुंतवणूक करून भरघोस पैसे कमवू शकता.

लिक्विड म्युचुअल फंड :
अल्प काळात भरघोस परतावा कमावण्यासाठी तुम्ही लिक्विड म्युचुअल फंडमध्ये पैसे लावू शकता. या म्युचुअल फंडांमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला मुदत ठेव खात्यापेक्षा जास्त व्याज परतावा मिळू शकतो, कारण ते 91 दिवसांत परिपक्व होणाऱ्या मनी मार्केट सिक्युरिटीजमध्ये पैसे गुंतवणूक करतात. ही गुंतवणूक सुरक्षित मानली जाते, त्यामुळे तुम्ही या योजनेत कधीही गुंतवणूक करू शकता आणि कधीही बाहेर पडू शकता. लिक्विड म्युचुअल फंडांतील गुंतवणुकीवर कर कपातीनंतर मिळणारा परतावा 4 टक्के ते 7 टक्के दरम्यान असतो. लिक्विड म्युचुअल फंडात किमान एक दिवस ते 90 दिवसांपर्यंत गुंतवणूक करता येते. लिक्विड फंडांच्या नेट अॅसेट व्हॅल्यूमध्ये/NAV मध्ये क्वचितच घट दिसून येते. तुम्ही ते रिडीम करताच, दोन ते तीन व्यावसायिक दिवसांत तुमचे सर्व पैसे तुमच्या खात्यात जमा केले जातात.

अल्ट्रा शॉर्ट ड्युरेशन फंड :
हा फंड एक डेट फंड म्हणून ओळखला जातो, जो कंपन्यांना 3 ते 6 महिन्यांच्या कालावधीसाठी कर्ज पुरवठा करतो. या फंडांचा कर्जाचा कालावधी कमी असतो, यामुळे ते लिक्विड फंडांपेक्षा थोडे जास्त जोखीमीचे मानले जातात. परंतु तरीही ही गुंतवणूक करण्यासाठी सर्वात कमी जोखमीच्या योजनापैकी एक मानली जाते. ज्या गुंतवणूकदारांना काही आठवडे किंवा काही महिन्यांसाठी पैसे गुंतवणूक करायचे आहेत, त्यांच्यासाठी हे फंड बेस्ट पर्याय आहेत. जे गुंतवणूकदार किमान तीन महिन्यांसाठी गुंतवणूक करतात, त्यांना पैसे गमावण्याचा धोका शून्य असतो.

मनी मार्केट फंड्स :
म्युच्युअल फंड गुंतवणूक पर्यायात जोखमीच्या दृष्टीने ही सर्वात कमी जोखीम असलेली गुंतवणूक म्हणजे मनी मार्केट फंड. साधारणपणे, मनी मार्केट फंड अल्प-मुदतीच्या सरकारी गुंतवणूक साधनामध्ये गुंतवणूक करतात. या मध्ये कॉल मनी मार्केट्स, कमर्शियल पेपर्स, ट्रेझरी बिले आणि बँक CD असे पर्याय असतात. यामध्ये तीन महिने ते एक वर्षाच्या कालावधीसाठी गुंतवणूक करता येते. या गुंतवणुकीत डीफॉल्ट होण्याचा आणि व्याजदरतील चढउतारांचा धोका कमी असतो.

पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजना :
इंडिया पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेवी कोणत्याही पोस्ट ऑफिस शाखेत जाऊन उघडता येतात. तुम्ही नजीकच्या कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन ठराविक कालावधीसाठी मुदत ठेव खाते उघडू शकता. भारत सरकार पोस्ट ऑफीसमधील FD वर आणि बँक FD वर पूर्ण हमी देते. काही योजनांमध्ये एक वर्षाचा लॉक-इन कालावधीही दिलेला असतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Short term investment opportunities for huge returns with less risk on 01 November 2022.

हॅशटॅग्स

#Short Term Investment(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x