SIP Calculator | 25 वर्ष वयात 2500 ची SIP सुरू करा, 47.5 लाख परतावा मिळेल, हिशोब समजून घ्या

SIP Calculator | बहुतेक तरुण आपल्या वयाच्या 22-25 व्या वर्षापासून नोकरीला सुरुवात करतात. जेव्हा आजकालचे तरुण कमाई सुरू करतात, तेव्हा त्यांच्या मनात एक प्रश्न नक्की येत असेल की, या तुटपुंज्या पगारातून बचत कशी करावी? आणि बचत केली तर गुंतवणूक कुठे करावी? जर तुमचे आर्थिक नियोजन व्यवस्थित असेल तर तुम्हाला असे प्रश्न पडणार नाही. गुंतवणूक करताना किती रक्कम गुंतवणूक केली यापेक्षा तुम्ही किती लवकर गुंतवणूक केली यावर लक्ष देणे महत्त्वाचे आहे. फक्त 5 वर्ष लवकर गुंतवणुकीला सुरुवात केल्यास तुमचा परतावा दुप्पट होऊ शकतो. करिअरच्या आपल्यावर कौटुंबिक आणि इतर जबाबदाऱ्या कमी असतात. अशा परिस्थितीत योग्य वेळेत गुंतवणूक सुरू केली तर तुम्ही दीर्घ काळात जबरदस्त मोठा परतावा कमवू शकता हे नक्की.
2500 रुपये SIP वर 40 लाख परतावा :
दीर्घकालीन गुंतवणुक करून चांगला परतावा कमावण्यासाठी एसआयपी हा सर्वात फायदेशीर मार्ग मानला जातो. दीर्घ काळात SIP गुंतवणूक तुम्हाला चक्रवाढ पद्धतीने परतावा देते आणि तुमची जोखीम देखील कमी करते. समजा रमेशचे आजचे वय 25 वर्षे असून त्याने दरमहा 2500 रुपये एसआयपी गुंतवणूक सुरू केली. म्युच्युअल फंडामध्ये 12 टक्के प्रतिवर्ष परतावा सहज मिळतो. समजा रमेशने पुढील 25 वर्षांसाठी दरमहा 2500 रूकाये नियमित SIP गुंतवणूक केल्यास त्याला 12 टक्के दराने 47.5 लाख रुपये निव्वळ परतावा मिळेल. या दरम्यान रमेशची प्रत्यक्ष गुंतवणूक फक्त 7.5 लाख रुपये असेल, ज्यावर त्याला सुमारे 40 लाखांचा बक्कळ परतावा मिळेल.
5 वर्षे अधिक गुंतवणूक केल्यास दुप्पट परतावा :
म्युच्युअल फंड गुंतवणूक करताना कालावधी किती महत्त्वाचा आहे याचा अंदाज या उदाहरणावरून समजून घ्या. समजा जर रमेशने 2500 रुपये 30 वर्षे कालावधी साठी SIP पद्धतीने गुंतवले. तर त्याला 12 टक्के दराने 88.24 लाख रुपये निव्वळ परतावा मिळेल. 30 वर्षांमध्ये त्याची प्रत्यक्ष गुंतवणुक 9 लाख रुपये होईल, ज्यावर त्याला 79.2 लाख रुपये परतावा मिळेल. या गणनेतून हे स्पष्ट होते की कालावधी फक्त 5 वर्ष वाढला तर परतावा दुप्पट होऊ शकतो.
किमान गुंतवणूक रक्कम :
बऱ्याच लोकांना गुंतवणूक करताना प्रश्न पडतो की, किती रुपये पासून गुंतवणूक सुरू करावी? जगात सर्वात उत्तम आर्थिक व्यवस्थापन करणारे लोकही 50:30:20 या नियमाच्या आधारावर आपली गुंतवणुक करतात. तज्ञांच्या मते, तुम्ही तुमचे सर्व आवश्यक खर्च तुमच्या उत्पन्नाच्या 50 टक्के मर्यादेत बसवले पाहिजे. गरजेव्यतिरिक्त इतर गोष्टींवर एकूण उत्पन्नाच्या 30 टक्के रक्कम खर्च करा. परदेशी सहल, कार खरेदी, करमणूक, हे सर्व खर्च याच 30 टक्के मधून करा. कोणत्याही परिस्थितीत आपल्या एकूण उत्पन्नाच्या किमान 20 टक्के रक्कम बचत करण्याचा प्रयत्न करा आणि ही रक्कम एसआयपी मध्ये गुंतवणूक करा.
30000 पगार असलेले व्यक्ती 2500 ची SIP सहज करू शकतात. जर तुम्हाला मासिक पगार 30 हजार रुपये असेल तर तुमच्या 20 टक्के बचत नुसार 6000 रुपये वाचतील. ही रक्कम वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करा. जर तुम्ही म्युच्युअल फंडात 2500 रुपयांची एसआयपी गुंतवणूक सुरू केली तर वयाच्या 50 व्या वर्षी तुमच्याकडे 47 लाख रुपयेचा मोठा फंड तयार होऊ शकतो. वयाच्या 55 व्या वर्षी हीच एसआयपी गुंतवणूक तुम्हाला 88 लाख रुपये परतावा मिळवून देईल.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| SIP Calculator for Counting Mutual Fund Investment Benefits and return in long term on 30 November 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Mangalam Seeds Share Price | जबरदस्त शेअर! 22 दिवसांत 130% परतावा दिला या शेअरने, स्टॉक डिटेल्स नोट करा
-
Shriram AMC Share Price | हा शेअर पैशाची उधळण करतोय, 3 आठवड्यात 110 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, स्टॉक डिटेल्स
-
Gold Price Today | आज सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीत घसरण, आजचे नवे दर जाणून घ्या
-
Sharda Cropchem Share Price | जोरदार कमाई! या 400% परतावा देणाऱ्या शेअरवर नवी टार्गेट प्राईस जाहीर, पैसा देणाऱ्या स्टॉकची डिटेल्स
-
Goldstone Technologies Share Price | मस्तच! जोरदार कमाई सुरु, या शेअरने फक्त 5 दिवसात 53% परतावा दिला, स्टॉक डिटेल्स पहा
-
360 ONE WAM Share Price | मस्तच! तिहेरी फायदा देणारा शेअर, गुंतवणुकदारांना फ्री बोनस शेअर्स, स्टॉक स्प्लिट प्लस डिव्हीडंड
-
Accelya Solutions India Share Price | आयटी सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीने 35 रुपये डिव्हीडंड जाहीर केला, रेकॉर्ड तारीख नोट करा
-
Comfort Intech Share Price | बापरे! 31 रुपयांचा शेअर धुमाकूळ घालतोय, 1100% टक्के परतावा दिला, स्वस्त शेअरची डिटेल्स पहा
-
Torrent Pharmaceuticals Share Price | जबरदस्त शेअर! 240% मल्टिबॅगर डिव्हीडंड मिळणार, रेकॉर्ड तारीख तपासा
-
Stocks To Buy | बँक FD वार्षिक व्याजापेक्षा चौपट परतावा देतील हे 4 शेअर्स, येथे पैसा वाढवा