2 May 2025 3:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

SIP Mutual Fund | गुंतवणूकदारांसाठी जानेवारी धमाका, एकूण 4 इक्विटी योजना होणार लॉन्च, जाणून घ्या तारीख

SIP Mutual Fund

SIP Mutual Fund | 2025 ची सुरुवात अगदी धूम धडाका झाली आहे. दरम्यान गुंतवणूकदारांसाठी नव्या वर्षात तेही जानेवारी महिन्यातच एकूण 4 नवीन इक्विटी फंड योजना लॉन्च होणार आहेत. या फंडांच्या लॉन्चिंगमुळे संपूर्ण गुंतवणूकदार वर्ग आनंदी होणार आहे. कारण की बऱ्याच मोठमोठ्या ऍसेट मॅनेजमेंट कंपन्या आपल्या नवनवीन इक्विटी फंडांना लॉन्च करणार आहे.

तुम्ही सुद्धा नवीन वर्षात एखाद्या नवीन फंडामध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. जानेवारी महिन्याच्या नेमच्या कोणकोणत्या तारखांना कोणकोणते इक्विटी फंड लॉन्च होणार आहेत हे पाहूया. या फंडांमार्फत गुंतवणूकदारांना लार्जकॅप फंडांमध्ये पैसे गुंतवण्यास आवडणार आहे.

UTI Quant Fund :

या फंडाचे मॅनेजर श्रवण कुमार गोयद असून यूटीआय म्युच्युअल फंडाच्या थिमॅटिक कॅटेगिरीमध्ये मोडणाऱ्या फंडांपैकी ‘यूटीआय काँट फंड’ हा एक आहे. हा म्युच्युअल फंड 2 जानेवारी ते 16 जानेवारी 2025 या तारखांच्या दरम्यान लॉन्च होऊ शकतो. या योजनेमध्ये तुम्ही कमीत कमी हजार रुपये गुंतवू शकता. योजनेच्या बेंचमार्कविषयी सांगायचे झाले तर, याचा बेंचमार्क BSE 200 TRI आहे.

WhiteOak Capital Quality Equity Fund :

व्हाईटओक कॅपिटल कॉलिटी इक्विटी फंड देखील जानेवारी महिन्यात लॉन्च केला जाणार आहे. याची लॉन्चिंग तारीख 8 ते 22 जानेवारीपर्यंत दिली आहे. हा एक नवीन थिमॅटिक फंड असून हा फंड अतिशय जबरदस्त आहे. कारण की या फंडामध्ये तुम्ही 500 रुपयांच्या गुंतवणुकीतून सुरुवात करू शकता. या फंडाचे दोन मॅनेजर आहेत ज्यांची नावे पियुष बरनवाल आणि रमेश मंत्री असे आहे.

Kotak Nifty Smallcap 250 Index Fund :

कोटक निफ्टी स्मॉल कॅप 250 इंडेक्स फंड हा 6 जानेवारी ते 20 जानेवारी या तारखेदरम्यान लॉन्च होण्याची शक्यता आहे. या इक्विटी फंडाचे मॅनेजर देवेंद्र सिंगल, अभिषेक बीसेन आणि सतीश डोंडापती असं आहे. फंडाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही यामध्ये 100 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता.

ICICI Prudential Ruler Opportunities Fund :

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल रुलर ऑपॉर्च्युनिटी फंडाचे मॅनेजर प्रियांका खंडेलवाल आणि शंकरन नरेन हे दोघं आहेत. या जानेवारीची लॉन्चिंग 9 जानेवारी ते 23 जानेवारी 2025 पर्यंत सुरू राहणार आहे. त्या योजनेची कमीत कमी गुंतवणूक 5000 रुपये दिली गेली आहे.

बरेच गुंतवणूकदार या इक्विटी फंडांच्या लॉन्चिंगची वाट पाहत आहेत. जेणेकरून त्यांना या फंडांमध्ये पैसे गुंतवून मालामाल होण्याचा स्वप्न पूर्ण करायचं.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | SIP Mutual Fund Thursday 02 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#SIP Mutual Fund(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या