5 May 2024 2:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर Smart Investment | श्रीमंत बनवतो हा 15*15*15 फॉर्म्युला, हमखास कोटीत परतावा मिळतो, सेव्ह करून ठेवा Health Insurance Premium | हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांना धक्का! 10 ते 15 टक्क्याने वाढणार पॉलिसी प्रिमिअम Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीच विचार आहे? तनिष्क, मलबार ज्वेलर्स आणि कल्याण ज्वेलर्सचे दर जाणून घ्या Govt Employee Pension | सर्व पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट! SBI सहित 5 सरकारी बँकेत नवीन सुविधा सुरु, फायदा घ्या
x

Gold Price Today | गुड-न्यूज! आज सोन्याचे भाव जोरदार कोसळले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या

Gold Price Today

Gold Price Today | गेल्या 1 आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. 22 एप्रिलला अक्षय्य तृतीया साजरी करण्यात आली. असे असूनही सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. याचं कारण म्हणजे सोन्याच्या महागण्यामुळे मागणीत झालेली घट.

गेल्या आठवड्यात शुक्रवारी सोने 60,191 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. तर सोमवारी हा दर 60629 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर होता. त्यामुळे या आठवड्यात सोन्याच्या दरात प्रति दहा ग्रॅम ४३८ रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे ही सोनं खरेदीची उत्तम संधी आहे असं तज्ज्ञांनी म्हटलं.

तर चांदीच्या दरातही गेल्या आठवड्यात घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारी चांदीचा भाव 74773 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. तर सोमवारी चांदीचा भाव 75530 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. त्यामुळे संपूर्ण आठवडाभरात चांदीचा भाव ७५७ रुपये प्रति किलोवर बंद झाला. चांदीने या महिन्यातील उच्चांकी पातळी गाठली आहे.

सोनं उच्चांकी स्तरापेक्षा 689 रुपयांनी स्वस्तात
सोनं सध्या आतापर्यंतच्या उच्चांकी स्तरापेक्षा 689 रुपयांनी स्वस्तात विकलं जात आहे. सोन्याने 13 एप्रिल 2023 रोजी उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोनं 60880 रुपये प्रति दहा ग्राम वर पोहोचला होता. सोन्याने या महिन्यात उच्चांकी पातळी गाठली आहे.

चांदीच्या दराची उच्चांकी पातळी
तर चांदीही 1096 रुपयांच्या उच्चांकी पातळीच्या खाली ट्रेड करत आहे. चांदीने 13 एप्रिल 2023 रोजी 75869 रुपयांचा उच्चांक गाठला होता. तर, शनिवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर सोन्याचा वायदा व्यवहार 648.00 रुपयांनी घसरून 59,855.00 रुपयांवर बंद झाला. तर 5 मे 2023 रोजी चांदीचा वायदा व्यवहार 831.00 रुपयांनी घसरून 74,670.00 रुपयांवर बंद झाला.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gold Price Today Updates check details on 23 April 2023.

हॅशटॅग्स

#Gold Price Today(249)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x