2 May 2025 11:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

Smart Investment | कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवण्याआधी 'या' गोष्टींची पुरेपूर काळजी घ्या, अन्यथा तोटा होईल

Smart Investment

Smart Investment | सध्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे प्रमाण वाढीस लागले आहे. परंतु अजूनही काही लोक शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम उचलण्यास घाबरतात. अशा व्यक्तींसाठी म्युच्युअल फंड इन्वेस्टमेंट अत्यंत उत्तम पर्याय आहे. शेअर बाजाराशी लिंक असलेल्या म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करून तुम्ही मालामाल बनू शकता.

काही व्यक्तींना म्युच्युअल फंडाचा फारसा चांगला अनुभव येत नाही. कारण की पंडात गुंतवणूक करण्याआधी फंडाविषयी पुरेपूर माहिती न घेतल्यामुळे तुमच्यावर नुकसानाची वेळ येऊ शकते. तुम्हाला दुप्पटीने नफा कमवायचा असेल तर बचतीची आणि गुंतवणुकीची योग्य माहिती तुमच्याजवळ असणे गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला म्युच्युअल फंड तसेच शेअर मार्केटशी निगडित असणाऱ्या योजनांमध्ये पैसे गुंतवण्यासाठी कोणत्या गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे याबद्दल सांगणार आहोत.

सर्वप्रथम हे जाणून घ्या की, म्युच्युअल फंड कसा निवडायचा :

म्युच्युअल फंडात करावयाची गुंतवणूक, त्याचबरोबर त्याचे धोरण आणि उद्दिष्टे या तीन गोष्टींबद्दल जाणून घेण्यासाठी आणि योजनेविषयी अचूक माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला ‘फॅक्ट शीट्स’ आणि ‘SID’ हे दोन दस्तऐवज अत्यंत महत्त्वाचे आहेत. या कागदपत्रांवर असणाऱ्या योग्य माहितीमुळे तुम्हाला गुंतवणुकीची चाहूल लागेल.

फंडाचे ओवरव्ह्यू महत्वाचे आहे :

SID म्हणजेच स्कीम इंफॉर्मेशन डॉक्युमेंट या डॉक्युमेंटमध्ये तुम्ही ज्या फंडमध्ये गुंतवणूक करणार आहात त्या फंडाचे ओव्हरव्ह्यू लिहिलेले असते. त्याचबरोबर गुंतवणुकीचे धोरण आणि उद्दिष्टे या संबंधित माहिती देखील नमूद असते.

कमीत कमी गुंतवणूक त्याचबरोबर SIP पर्याय :

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याआधी गुंतवणूकदाराने गुंतवणुकीसाठीचे कोणकोणते पर्याय दिले गेले आहेत याची माहिती घ्यावी. त्याचबरोबर सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP की, एक रक्कमी गुंतवणूक करावी लागणार या गोष्टीची देखील माहिती घ्यावी.

जोखीमेची माहिती :

तुम्ही ज्या फंडमध्ये गुंतवणूक करणार असाल त्या फंडमध्ये नेमकी किती जोखीम पत्करावी लागेल याची देखील पुरेपूर माहिती तुम्ही घ्यावी. दरम्यान संबंधित जोखीम आणि व्याजदरावरील चढउतारांचा देखील आढावा घ्यावा.

मालमत्ता वाटपाविषयी पुरेपूर माहिती असावी :

विविध उद्योग क्षेत्र, बाजार त्याचबरोबर भौगोलिक क्षेत्रांमध्ये कशाप्रकारे मालपत्ता वाटप केली जाते याची माहिती असावी. कारण की लार्जकॅप फंडमध्ये मोठमोठे व्यवसाय आणि कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. अशातच स्मॉल कॅप फंड औद्योगिक कंपन्यांमधील स्टॉकमध्ये गुंतवणूक करतात.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Smart Investment 28 November 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Smart Investment(102)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या