
Tata Mutual Fund | ‘टाटा डिजिटल इंडिया म्युचुअल फंड डायरेक्ट प्लॅन’ ने मागील पाच वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 199.56 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युच्युअल फंड योजनेची सुरुवात डिसेंबर 2015 मध्ये झाली होती. सध्या मीता शेट्टी या मुख्य निधी व्यवस्थापक म्हणून ही योजना ऑपरेट करत आहेत. या म्युचुअल फंड योजनेने अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे तिप्पट वाढवले आहेत.
‘टाटा डिजिटल इंडिया म्युच्युअल फंड’ ही एक इक्विटी म्युच्युअल फंड योजना आहे. या म्युचुअल फंडाच्या माध्यमांतून मुख्यतः माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या इक्विटी आणि इक्विटी संबंधित साधनांमध्ये निव्वळ मालमत्ता मूल्याच्या किमान 80 टक्के गुंतवणूक केली जाते. या म्युचुअल फंड योजनेच्या मालमत्तेचा आकार 6,463.67 कोटी रुपये असून सध्याचे प्रति युनिट निव्वळ मालमत्ता मूल्य 37.49 रुपये आहे.
टाटा डिजिटल इंडिया म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ :
टाटा डिजिटल इंडिया म्युच्युअल फंड योजनेच्या पोर्टफोलिओमध्ये आयटी क्षेत्रातील शेअर्सचा वाटा 93.4 टक्के आहे. यामध्ये सॉफ्टवेअर, आयटीईएस आणि हार्डवेअर कंपनीचे शेअर्स सामील आहेत. उर्वरित 6.6 टक्के रोख गुंतवणूक आहे. या म्युचुअल फंड योजनेने विदेशी आयटी कंपन्या जसे Amazon, Accenture, Adobe, Microsoft, Alphabet, Globant शिवाय भारतात इन्फोसिस, TCS , HCL आणि टेक महिंद्रा यासारख्या कंपन्यांमध्येही खूप गुंतवणूक केली आहे.
टाटा डिजिटल इंडिया म्युच्युअल फंडाची कामगिरी :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 आणि 5 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना अनुक्रमे 117.57 टक्के आणि 199.56 आत्क्के परिपूर्ण परतावा कमावून दिला आहे. याच कालावधीत 17.33 टक्के आणि 10.62 टक्के श्रेणी सरासरी परताव्याच्या तुलनेत सरासरी वार्षिक परतावा 29.55 टक्के आणि 24.51 टक्के होता. या म्युचुअल फंड योजनेने सुरुवातीपासून आतापर्यंत आपल्या गुंतवणुकदारांना 20.32 टक्के सरासरी वार्षिक परतावा कमावून दिला आहे. मागील 5 वर्षात या योजनेच्या माध्यमातून गुंतवणूकदारांनी 199.56 टक्के परतावा कमावला आहे. ज्या लोकांनी 5 वर्षांपूर्वी या म्युचुअल फंड योजनेत पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता वाढून तिप्पट झाले आहे.
पाच वर्षांच्या SIP वर परतावा :
जर तुम्ही या म्युचुअल फंड योजनेत पाच वर्षांसाठी 10,000 रुपयांची मासिक एसआयपी गुंतवणूक सुरू केली असती तर तुम्हाला 10.75 लाख रुपये परतावा मिळाला असता. म्हणजेच तुमच्या 6 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर पाच वर्षांत तुम्हाला 79.29 टक्के परतावा मिळाला असता. म्युचुअल फंड योजना ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे, म्हणून हाच परतावा पुन्हा पुन्हा मिळेल याची शाश्वती नाही.
टाटा डिजिटल इंडिया म्युच्युअल फंड योजना दीर्घकाळासाठी इक्विटी योजनांमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी खूप फायद्याची आहे. परंतु या म्युचुअल फंड योजनेत जोखीम देखील आहे. ही योजना अधिक जोखीम घेऊ शकतात अशा लोकांसाठी योग्य आहे. हा सेक्टोरल म्युचुअल फंड असल्याने तो एका विशिष्ट क्षेत्राच्या इक्विटी शेअर्समध्ये अधिक पैसे लावतो. आयटी क्षेत्राशी संबंधित कोणतीही सकारात्मक किंवा नकारात्मक घोषणा या म्युचुअल फंड योजनेच्या कामगिरीवर परिणाम करू शकते. त्यामुळे, या योजनेतील गुंतवणुकीत जोखीम जास्त आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.