13 December 2024 4:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक पुन्हा रॉकेट होणार, कंपनीने योजना आखली, स्टॉक BUY करावा का - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, SBI फंडाच्या 'या' योजनेत SIP करा, खात्यात 1.31 कोटी रुपये जमा होतील EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम
x

Tata Mutual Fund | टाटा समूहाच्या या म्युच्युअल फंड योजनांमध्ये तुम्ही वेगाने संपत्ती वाढवू शकता, एसआयपी पर्यायातून मोठा रिटर्न

Tata mutual fund

Tata Mutual Fund | टाटा समुहाबद्दल आपल्याला माहीत असेलच, भारतातील एक मोठा आणि लोकांचा विश्वास असलेला उद्योग समूह म्हणून टाटा उद्योग समूह प्रसिद्ध आहे. याच टाटा समूहाच्या टाटा म्युच्युअल फंडाने, टाटा निफ्टी इंडिया डिजिटल ईटीएफ एफओएफ लाँच केले होते. ही योजना यावर्षी एप्रिल महिन्यात लाँच करण्यात आली होती.

टाटा म्युच्युअल फंड:
टाटा म्युच्युअल फंड ही भारतातील आघाडीच्या मालमत्ता व्यवस्थापन कंपनीपैकी एक आहे. ह्या कंपनीने टाटा निफ्टी इंडिया डिजिटल ईटीएफ एफओएफ निफ्टी मिडकॅप ५० इंडेक्स फंड लाँच केला आहे. या न्यू फंड ऑफरमध्ये 25 मार्च पासून गुंतवणुकीस सुरुवात करण्यात आली आहे.  एक ओपन एंडेड योजना आहे. त्याचा बेंचमार्क निर्देशांक निफ्टी इंडिया डिजिटल इंडेक्स आहे. या म्युचुअल फंड योजनेद्वारे, गुंतवणूकदारांना दिग्गज मोठा बाजार भांडवल असलेल्या टेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळेल.

गुंतवणूक मर्यादा :
या योजनेत तुम्हाला जर गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही किमान 5000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. टाटा निफ्टी इंडिया डिजिटल ETF FoF मध्ये एकरकमी किमान 5,000 रुपये पासून गुंतवणूक करता येईल. हा इक्विटी फंड तंत्रज्ञान श्रेणीत मोडतो. हा एक ओपन एंडेड फंड असून फंड ऑफ फंड स्कीम अंतर्गत टाटा निफ्टी इंडिया डिजिटल एक्सचेंज ट्रेडेड फंडमध्ये गुंतवणूक करेल.

टेक्नॉलॉजी चा वाढता वापर :
फंड हाऊसचे म्हणणे आहे की, स्मार्टफोन्सचा वाढता वापर, कमी डेटा दर आणि UPI चा वाढता वापर यामुळे भारतात प्रचंड मोठ्या प्रमाणात डिजिटायझेशन होत आहे. त्यामुळे इंटरनेट, स्मार्टफोन, ऑनलाइन पेमेंट आणि डेटा, सोशल मीडिया वापरणाऱ्यांमध्ये लक्षणीय होत आहे. यामुळे कंपन्यांच्या डिजिटायझेशनला अधिक चालना मिळण्यास, आणि विस्तार करण्यास मदत होईल.

तज्ञांचा सल्ला : टाटा म्युच्युअल फंडाच्या वेबसाइटनुसार, ज्या गुंतवणूकदारांना दीर्घकालीन संपत्ती निर्माण करायची आहे त्यांच्यासाठी टाटा निफ्टी इंडिया डिजिटल ईटीएफ एफओएफ हा एक गुंतवणुकीचा जबरदस्त पर्याय आहे. तसेच, टाटा निफ्टी इंडिया डिजिटल ईटीएफमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ही एक मजबूत परतावा देणारी योजना ठरेल, असे तज्ञांचे मत आहे. उत्पादनात गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही आर्थिक सल्लागाराचा सल्ला निश्चित घ्यावा.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Mutual Fund return on long term investment on 8 August 2022.

हॅशटॅग्स

#Tata Mutual Fund(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x