15 August 2022 8:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Financial Tips | आर्थिक स्वातंत्र्यासाठी या 5 गोष्टी लक्षात ठेवा, सर्व आर्थिक चिंतांपासून होईल सुटका Numerology Horoscope | मंगळवारसाठी तुमचा लकी नंबर आणि शुभ रंग कोणता असेल, काय सांगतं अंकज्योतिष शास्त्र Old Salary Account | तुमच्या जुन्या सॅलरी अकाउंटमुळे तुम्हाला हे 5 नुकसान होतात, अशाप्रकारे लवकर बंद करा Ola S1 e-Scooter | ओला S1 इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च, 141 किमी रेंजचा दावा, किंमतीसह सर्व माहिती जाणून घ्या Horoscope Today | 16 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Utsav Deposit Scheme | एसबीआयने सुरु केली उत्सव फिक्स्ड डिपॉझिट योजना, जाणून घ्या योजनेचे फायदे Gold Bond Scheme | तुम्हाला स्वस्त सोनं खरेदीची संधी मिळणार, जाणून घ्या कधीपर्यंत गुंतवणूक करू शकाल
x

Mutual Funds | 10 स्मॉल कॅप म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांना दिला 80 टक्केपेक्षा जास्त परतावा, गुंतवणूकदारांची जबरदस्त कमाई

mutual fund

Mutual Funds | तुम्ही तुमचा गुंतवणूक पोर्टफोलिओ विविधतापूर्ण बनवला पाहीजे. जेणेकरून तुमची गुंतवणूक सुरक्षित राहील आणि परतावाही चांगला मिळेल. म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचे अनेक फायदे आहेत, ते तुम्हाला चांगला परतावा देते आणि दीर्घकालीन गुंतवणुकीची संधी ही देते.

तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ तयार करताना वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करावी जेणेकरून तुमची गुंतवणूक सुरक्षित राहते आणि नफा चांगला मिळू शकतो. म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचे अनेक फायदे आहेत, ते तुम्हाला दीर्घ कालावधीत चांगला परतावा देतात आणि कर वाचविण्यातही मदत करतात. स्मॉल कॅप म्युच्युअल फंडांनी गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे. आज आम्ही तुम्हाला अशा 10 म्युच्युअल फंडांबद्दल सांगणार आहोत ज्यांनी मागील एका वर्षात गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिला आहे.

BOI AXA स्मॉल कॅप फंड डायरेक्ट ग्रोथ फंड :
या फंडाने मागील एका वर्षात गुंतवणूकदारांना 50.1 टक्के परतावा दिला आहे. फंडाचे निव्वळ मालमत्ता मूल्य 27.56 कोटी रुपये आहे आणि फंडाचा आकार 232.13 कोटी रुपये आहे. तुम्ही यामध्ये किमान 1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता.

अॅक्सिस स्मॉल कॅप फंड :
या फंडाने मागच्या एका वर्षात गुंतवणूकदारांना 46.1 टक्के परतावा दिला आहे. या फंडाचे निव्वळ मालमत्ता मूल्य 67.41 कोटी रुपये आहे. आणि फंडाचा आकार 8410.88 कोटी रुपये आहे. तुम्ही या फंडात किमान 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता.

कोटक स्मॉल कॅप फंड :
या फंडाने मागच्या एका वर्षात गुंतवणूकदारांना 46.7 टक्के परतावा मिळवून दिला आहे. फंडाची निव्वळ मालमत्ता मूल्य 183.33 कोटी रुपये आहे. आणि फंडाचा आकार 6810.75 कोटी रुपये आहे. तुम्ही या फंडात किमान 1000 रुपये ने गुंतवणूक सुरू करू शकता.

निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड :
या फंडाने मागील एका वर्षात गुंतवणूकदारांना 53% परतावा मिळवून दिला आहे. या फंडाचे निव्वळ मालमत्ता मूल्य 92.41 कोटी रुपये आहे. आणि फंडाचा आकार 18933.35 कोटी रुपये आहे. तुम्ही याफंडात किमान 100 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता.

टाटा स्मॉल कॅप फंड :
मागच्या एका वर्षात या फंडाने गुंतवणूकदारांना 53.6% परतावा मिळवून दिला आहे. या फंडाचे निव्वळ मालमत्ता मूल्य 27.56 कोटी रुपये आहे. आणि फंडाचा आकार 232.13 कोटी रुपये एवढा आहे. तुम्ही या फंडात तुम्ही किमान 1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता.

SBI स्मॉल कॅप फंड :
या फंडाने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 50.1% परतावा मिळवून दिला आहे. या फंडाचे निव्वळ मालमत्ता मूल्य 22.60 कोटी रुपये आहे. आणि फंडाचा आकार 1930.55 कोटी रुपये आहे. तुम्ही याफंडात किमान 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता.

क्वांट स्मॉल कॅप फंड :
या स्मॉल कॅप फंडाने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 79.3 टक्के इतका भरघोस परतावा दिला आहे. या म्युचुअल फंडाचे निव्वळ मालमत्ता मूल्य 143.50 कोटी रुपये आहे. आणि या फंडाचा आकार 1517.18 कोटी रुपये आहे.यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला किमान 1000 रुपये जमा करावे लागेल.

ICICI प्रुडेन्शियल स्मॉल कॅप फंड :
या स्मॉल कॅप म्युचुअल फंडाने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 42.5% परतावा मिळवून दिला आहे. या म्युचुअल फंडाचे एकूण निव्वळ मालमत्ता मूल्य 54.23 कोटी रुपये आहे. आणि म्युचुअल फंडाचा आकार 3464.36 कोटी रुपये आहे. तुम्हाला या म्युचुअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी किमान 100 रुपये जमा करावे लागतील.

युनियन स्मॉल कॅप फंड :
या स्मॉल कॅप म्युचुअल फंडाने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 41.9 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या म्युचुअल फंडाचे निव्वळ मालमत्ता मूल्य 30.50 कोटी रुपये आहे. आणि फंडाचा आकार 593.77 कोटी रुपये आहे. तुम्हाला या फंडात गुंतवणूक करण्यासाठी किमान 2000 रुपये जमा करावे लागतील.

इंवेस्को इंडिया स्मॉल कॅप फंड :
मागील एका वर्षात या म्युचुअल फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना 39.टक्के परतावा मिळवून दिला आहे. या स्मॉल कॅप म्युचुअल फंडाचे निव्वळ मालमत्ता मूल्य 22.08 कोटी रुपये आहे. आणि फंडाचा आकार 1275.05 कोटी रुपये आहे. तुम्हाला या फंडात गुंतवणूक करण्यासाठी किमान 500 रुपये जमा करावे लागतील.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Top 10 Mutual funds list has given huge returns to investors in short term period on 5 August 2022.

हॅशटॅग्स

#Mutual Funds(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x