
SBI Mutual Fund | SBI म्युच्युअल फंड योजनेचा परतावा चार्ट पाहिल्यास आपल्याला असे दिसेल की ह्या म्युचुअल फंड ने आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घकाळात चांगला परतावा मिळवून दिला आहे. बाजारात असे अनेक म्युच्युअल फंड आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती केले आहे.
SBI म्युच्युअल फंडच्या सर्वोत्तम योजना:
भारतातील सर्वात मोठी बाजार भांडवल असणारी सरकारी बँक SBI चा स्वतःचाही म्युच्युअल फंडचा वेगळा व्यवसाय आहे. SBI म्युच्युअल फंड या नावाने ही मालमत्ता व्यवस्थापन कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना विविध श्रेणींमध्ये गुंतवणुकीची संधी उपलब्ध करून देते. SBI म्युच्युअल फंड योजनेचा परतावा चार्ट पाहिल्यास असे दिसेल की, या योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घ काळात भरमसाठ परतावा मिळवून दिला आहे. जर तुम्ही या योजनेच्या मागील 20 वर्षांच्या परताव्यावर नजर टाकली तर आपल्या असेल दिसेल की, ज्या गुंतवणूकदारांनी SBI च्या म्युच्युअल फंड योजनेमध्ये सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP पद्धतीने दरमहा 5000 रुपयेची गुंतवणूक केली होती, त्यांनी आतापर्यंत 19.4 टक्के CAGR परतावा कमावला आहे. या परताव्याच्या आधारावर एसआयपी गुंतवणुकीचे मूल्य 20 वर्षांत 1.14 कोटी रुपये पेक्षा अधिक झाले असते. आज या लेखात आम्ही तुम्हाला एसबीआय म्युच्युअल फंडाच्या अशा 5 योजनाची माहिती देणार आहोत,ज्यांनी मागील 20 वर्षांत दिलेला एसआयपी परतावा सर्वाधिक आहे.
SBI Consumption Opportunities Fund :
* 20 वर्षांचा SIP परतावा दर : 19.4 टक्के CAGR
* 5000 रुपये मासिक SIP मूल्य : 1.14 कोटी रुपये (20 वर्षांमध्ये)
* किमान एकरकमी गुंतवणूक मर्यादा : 5000 रुपये
* किमान SIP गुंतवणूक मर्यादा : 500 रुपये
* एकूण मालमत्ता : 953 कोटी (एप्रिल 30, 2022)
* खर्चाने प्रमाण : 2.51 टक्के (एप्रिल 30, 2020)
एसबीआय मॅग्नम ग्लोबल फंड :
* 20 वर्षांचा एसआयपी परतावा: 19 टक्के CAGR
* 5000 रुपये मासिक एसआयपी मूल्य : 1.08 कोटी
* किमान एकरकमी गुंतवणूक : रुपये 5000
* किमान एसआयपी: रुपये 500
* एकूण मालमत्ता: 4953 कोटी (30 एप्रिल, 2022)
* खर्च प्रमाण : 02 03 टक्के
SBI लार्ज अँड मिडकॅप फंड :
* 20 वर्षांचा एसआयपी परतावा: 18.28 टक्के CAGR
* 5000 रुपये मासिक एसआयपी मूल्य : 1 कोटी
* किमान एकरकमी गुंतवणूक : 5000 रुपये
* किमान SIP गुंतवणूक मर्यादा : 500 रुपये
* एकूण मालमत्ता : 6599 कोटी (30 एप्रिल, 2022)
* खर्च प्रमाण : 2.80 टक्के
एसबीआय कॉन्ट्रा म्युचुअल फंड
* 20 वर्षांचा SIP परतावा : 17.55 टक्के CAGR
* 5000 मासिक SIP मूल्य : 91 लाख रुपये
* किमान एकरकमी गुंतवणूक : 5000 रुपये
* किमान SIP गुंतवणूक मर्यादा : 500 रुपये
* एकूण मालमत्ता : 4491 कोटी (एप्रिल 30, 2020)
* खर्च प्रमाण : 2.10 टक्के
SBI Technology Opportunities Fund :
* 20 वर्षांचा SIP परतावा : 17.44 टक्के CAGR
* 5000 मासिक SIP मूल्य : 91 लाख रुपये
* किमान एकरकमी गुंतवणूक : 5000 रुपये
* किमान SIP गुंतवणूक मर्यादा : 500 रुपये
* एकूण मालमत्ता : 2432 कोटी
* खर्च प्रमाण : 2.32 टक्के
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.