30 April 2025 5:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

राहुल गांधी यांनी निर्णय घेतला तर महाविकास आघाडीतून बाहेर पडू | विजय वडेट्टीवार

Rahul Gandhi, Mahavikas Aghadi government, Minister Vijay Wadettiwar, Shivsena

नागपूर, २४ ऑगस्ट : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सोमवारी अपेक्षेप्रमाणे पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. आज काँग्रेसच्या कार्यकारिणीची व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीच्या सुरुवातीलाच सोनिया गांधी यांनी आपली भूमिका मांडली. त्यांनी म्हटले की, पक्षाध्यक्षपदाच्या स्थित्यंतरासाठी प्रक्रिया सुरु करावी. जेणेकरून मला अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त होता येईल, असे सोनिया गांधी यांनी म्हटल्याचे समजते. या बैठकीच्या सुरुवातीलाच सोनिया गांधी यांनी आपल्याला पक्षाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, असे सांगितले. त्यामुळे आता काँग्रेसची सूत्रे पुन्हा राहुल गांधी यांच्याकडे येण्याची शक्यता आहे.

मात्र, त्यामुळे राज्यातील महाविकासआघाडीच्या भवितव्याविषयी प्रश्न उपस्थित झाले आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरातील पत्रकारपरिषदेत केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे. काँग्रेसने महाराष्ट्रात शिवसेनेसोबत जाऊ नये, अशी राहुल गांधी यांची इच्छा होती. त्यामुळे आता त्यांच्याकडे पक्षाची सूत्रे गेल्यास काँग्रेसची भूमिका काय असेल, असा प्रश्न विजय वडेट्टीवार यांना विचारण्यात आला. त्यावर वडेट्टीवार यांनी म्हटले की, राहुल गांधी यांच्या इच्छेनुसारच महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष महाविकासआघाडी मध्ये सहभागी झाला होता. उद्या जर राहुल गांधी यांनी निर्णय घेतला की सरकार मधून बाहेर पडावे तर आम्ही बाहेर पडू, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

 

News English Summary: Rahul Gandhi wanted the Congress not to go with the Shiv Sena in Maharashtra. Therefore, Vijay Wadettiwar was asked what would be the role of the Congress if he got the party formula now. On this, Wadettiwar said that the Congress party in Maharashtra had joined the Mahavikasaghadi as per the wishes of Rahul Gandhi.

News English Title: If Rahul Gandhi orders we will quit Mahavikas Aghadi government in Maharashtra News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या