26 July 2021 12:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Special Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी
x

'जनता बकवास थापेबाजीला कंटाळली', शिवसेनेचा फडणवीस आणि गडकरींना टोला

Nagpur ZP Election 2020, Union Minister Nitin Gadkari, Devendra Fadnavis, Saamana Newspaper

मुंबई : नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा मानहानीकारक पराभव झाल्यानंतर शिवसेनेनं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. ‘सगळय़ात धक्कादायक आणि सनसनाटी निकाल लागला आहे तो नागपूर जिल्हा परिषदेचा. देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांच्या नाकावर टिच्चून तेथे काँग्रेसने मुसंडी मारली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव फडणवीस, गडकरींच्या गावातच झाला. शिवसेना काँग्रेसच्या रंगात रंगली असून भगवा रंग विसरली असल्याची गरळ गडकरी यांनी दोन दिवसांपूर्वीच ओकली होती. पण नागपूर हा त्यांचा बालेकिल्ला असतानाही फडणवीस-गडकरी तेथील भारतीय जनता पक्षाचा पराभव का थांबवू शकले नाहीत? याचे कारण एकच, ग्रामीण भागातील जनता तुमच्या रोजच्या ‘बकवास’ थापेबाजीला कंटाळली आहे,’ असा घणाघात शिवसेनेनं केला आहे.

धुळे वगळता भारतीय जनता पक्ष कुठेच नाही. सगळ्यात धक्कादायक निकाल लागला आहे तो नागपूर जिल्हा परिषदेचा. देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांच्या नाकावर टिच्चून तेथे काँग्रेसने मुसंडी मारली आहे. एकंदरीत महाराष्ट्रातील सत्ता हेच भारतीय जनता पक्षाचे ‘टॉनिक’ होते. ते टॉनिकच संपल्यामुळे बाळसं म्हणून दिसणारी सूज उतरली आहे, असं म्हणत शिवसेनेनं भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे.

मावळत्या जिल्हा परिषदेत शिवसेनेची पाटी कोरी होती. आता ४ जागांवर विजय मिळाला. नंदुरबार जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष-काँग्रेस २३-२३ असे लोक निवडून आले. येथेही शिवसेनेचा तक्ता कोरा होता. आता सात जागांवर शिवसेना विजयी झाली. शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय नंदुरबार जिल्हा परिषदेत कोणालाही सत्ता स्थापन करता येणार नाही. नंदुरबारमध्येही काँग्रेसने थोडे हुशारीने घेतले असते व शिवसेनेसह महाविकास आघाडी म्हणून लोकांसमोर गेले असते तर जिल्हा परिषदेतून भारतीय जनता पक्षाचे नामोनिशाण मिटले असते,’ अशा शब्दांत शिवसेनेनं भारतीय जनता पक्षावर तोफ डागली आहे.

 

Web Title:  Shivsena criticizes Former CM Devendra Fadanvis and Union Minister Nitin Gadkari after Nagpur ZP Election Result.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x