26 July 2021 3:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Special Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी
x

नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे बना : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Union Minister Nitin Gadkari

नागपूर: नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे बना, असा सल्ला केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी महिला उद्योजिका मेळाव्याच्या उदघाटन प्रसंगी उपस्थितांना दिला. यावेळी जेष्ठ सिने कलाकार नाना पाटेकर उपस्थित होते. “महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी असे मेळावे उपयुक्त आहेत. नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे बना. सूक्ष्म उद्योग खात्याचा मी मंत्री आहे माझ्याकडे मोठं बजेट आहे. तुम्ही उद्योगासाठी पुढे या आम्ही तुम्हाला मदत करू”, असा सल्ला सुद्धा गडकरी यांनी दिला.

BhagyaVivah Marathi Matrimonial

पुढे गडकरी उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले की “महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी असे मेळावे उपयुक्त आहेत. नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे बना. सूक्ष्म उद्योग खात्याचा मी मंत्री आहे माझ्याकडे मोठं बजेट आहे. तुम्ही उद्योगासाठी पुढे या आम्ही तुम्हाला मदत करू”, असा सल्ला सुद्धा गडकरी यांनी दिला. नागपूरच्या रेशीम बाग मैदानात महिला उद्योजिका मेळावा नागपूर महानगरपालिके तर्फे आयोजित करण्यात आला होता. यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला उद्योजकांनी भाग घेतला. वेगवेगळ्या प्रकारेचे छोटे छोटे उद्योग यात सहभागी झाले होते.

‘देशात योजना राबवण्यासाठी पैशांची कमतरता नसून सरकारमध्ये निर्णय घेण्याचीच हिंमत नाही’, असे वक्तव्य करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सरकारच्या कार्यशैलीवर बोट ठेवले आहे. विविध योजनांवर काम न होण्याची कारणे सरकारची मानसिकता आणि नकारात्मक दृष्टीकोन ही असल्याचेही गडकरी म्हणाले. ते नागपुरात विश्वेश्वरैया राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थेच्या कार्यक्रमात बोलत होते. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या वक्तव्यामुळे मोदी सरकारच्या कार्यशैलीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सरकारमध्ये निर्णय घेण्याती हिम्मत नाही, असे गंभीर विधानही यावेळी केंद्रीय मंत्री गडकरींनी या वेळी केले. ते पुढे म्हणाले की, ‘परवा मी एका उच्च स्तरीय बैठकीला गेले होतो. तिथे हे सुरू करणार…. ते सुरू करणार… असे ते आयएएस अधिकारी म्हणत होते. मी त्यांना म्हटले की, तुम्ही का सुरू करणार?… तुमची जर सुरू करण्याची हिम्मत असती, तर तुम्ही आयएएस अधिकारी बनून इथे नोकरी का करता?.’

तत्पूर्वी, शहरातील दळणवळणासाठी स्काय बसचा प्रस्ताव ठेवला होता. ६०० कोटी रुपयांचा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आता पीपीपी प्रकल्पाचा अवलंब करा, कारण सरकारकडे आता पैसे नाहीत. तेव्हा खासगी भागीदारी आणि सरकार यातून बीओटी आणि पीपीपी तत्त्वावरच या पुढे काम करावे लागणार आहे. कारण पैशाचे सोंग आणता येत नाही, असे सांगत औरंगाबाद शहरासाठी सूचविलेल्या ‘स्काय -बस’ साठी तोच मार्ग योग्य ठरेल, असे ते औरंगाबाद येथील ‘अ‍ॅडव्हान्टेज महाराष्ट्र’ या लघू उद्योजकांच्या ‘मासिआ’ संघटनेतर्फे आयोजित प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी म्हणाले होते.

 

Web Title:  Union minister Nitin Gadkari talked on women business.

हॅशटॅग्स

#Nitin Gadkari(74)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x