
HDFC Bank Recruitment 2022 | नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. वास्तविक, खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँक चालू आर्थिक वर्षात (आर्थिक वर्ष २०२३) महाराष्ट्रात आपले जाळे विस्तारण्यासाठी 3,000 हून अधिक लोकांना बँकेत नोकरी देणार आहे.
चालू आर्थिक वर्षात राज्यात २०७ नवीन बँक शाखा आणि ८० स्मार्ट बँकिंग लॉबी उघडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असे बँकेने गुरुवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. नव्या शाखांपैकी ९० शाखा महानगर आणि शहरी भागात असतील, तर उर्वरित शाखा निमशहरी आणि ग्रामीण भागात सुरू करण्यात येतील, असे बँकेने म्हटले आहे.
एचडीएफसी बँकेचे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जाळे :
एचडीएफसी बँकेचे शाखा बँकिंग प्रमुख अभिषेक देशमुख यांनी सांगितले की, राज्यातील २९ जिल्ह्यांमध्ये बँकेचे क्रेडिट टू डिपॉझिट रेशो १०० टक्क्यांहून अधिक आहे. सध्या प्रत्येक जिल्ह्यात आणि राज्यातील 280 हून अधिक तालुक्यांमध्ये बँकेचे जाळे आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.