14 December 2024 6:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

Infosys Freshers Recruitment 2021 | इन्फोसिसमध्ये (महाराष्ट्र) लवकरच फ्रेशरची भरती होणार - सविस्तर वाचा

Infosys Freshers Recruitment 2021

मुंबई, 05 नोव्हेंबर | देशातील प्रमुख आणि जागतिक ख्यातीच्या इन्फोसिस या आयटी क्षेत्रातील कंपनीत नोकरी करण्याचं अनेक तरुणाचं स्वप्नं असतं आणि ते प्रत्यक्षात खरं ठरण्याची संधी सुशिक्षित तरुणांना लवकरच प्राप्त होणार आहे. कंपनीने आर्थिक स्तरावर चांगली कामगिरी केल्यानंतर भविष्यातील वाढीसाठी मोठ्या प्रमाणावर योजना आखण्यास (Infosys Freshers Recruitment 2021) सुरुवात केली आहे.

Infosys Freshers Recruitment 2021. It is reported that Infosys is going to implement a large scale recruitment drive 2021 for recruitment. The recruitment will be for all departments of Infosys. This will opportunities for engineers and graduates from the 2017-2021 batch :

आयटी क्षेत्रातील तंत्रामुळे इन्फोसिस सारख्या मोठ्या कंपनीत कर्मचारी गळतीचे प्रमाण दुसऱ्या तिमाहीत वाढून २०.१ टक्क्यांवर गेले आहे. त्यामुळे कंपनीच्या दैनंदिन कामात अडथळे निर्माण झाले आहेत. आधीच्या तिमाहीत ते १३.९ टक्के होते. कंपनीने अपेक्षित महसूलवृद्धी १४ ते १६ टक्क्यांवरून वाढवून १६.५ ते १७.५ टक्के केली आहे. तसेच कंपनीला भविष्यातील प्रगतीसाठी मोठ्या प्रमाणावर नोकरभरती करणे आवश्यक आहे.

सदर भरतीसाठी इंफोसिस कंपनी मोठ्या प्रमाणावर रिक्रुटमेंट ड्राइव्ह २०२१ राबवणार आहे असं वृत्त आहे. विशेष म्हणजे ही भरती इन्फोसिसच्या सर्वच विभागांसाठी होणार आहे. यामध्ये 2017 ते 2021 बॅच पासूनच्या इंजिनियर्स आणि पदवीधारकांना विशेष संधी दिली जाणार आहे. त्यासाठी कंपनीने रिक्रुटमेंट ड्राइव्ह २०२१ ची जोरदार तयारी सुरु केली आहे.

इन्फोसिस ऑफ कॅम्पस रेजिस्ट्रेशन ड्राईव्ह 2021 फॉर फ्रेशर्स मध्ये कोणाला संधी मिळणार:
१. 2017/ 2018/ 2019/ 2020 Batch:
* BE/ B.Tech
* ME/ M.Tech
* Auto/ Civil
* CSE/ EEE
* ECE/ ICE
* Mech/ Telecom
* M.Sc/ MCA

भरती डिपार्टमेंट:
Engineering Department

एकूण भरती:
माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नाही.

मुलाखतीची तारीख:
* लवकरच प्रसिद्ध केली जाईल.
* मुलाखत टेलिफोन कॉल किंवा स्काईप व्हिडिओ कॉलच्या पर्यायात सुद्धा होऊ शकते असं वृत्त आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Infosys Freshers Recruitment 2021 implement a large scale recruitment drive 2021.

हॅशटॅग्स

#Naukri(36)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x