11 May 2025 4:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पासंबंधित RTI च्या 'अतिजलद' माहितीतून शिंदे सरकारचीच पोलखोल झाली

Vedanta Project

Vedanta Project | वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प नेमका कुणामुळे गेला, याचा तपास घेण्यासाठी सदर कार्यकर्त्याने माहिती मागवल्याचे दाखवले जात आहे. मात्र सरकारने दिलेली ही माहिती पोलखोल करणारी आहे, अशी प्रतिक्रिया अरविंद सावंतांनी दिली. आदित्य ठाकरे यांनी काल टाइमलाइन देऊन चर्चा करण्यासाठी समोर या म्हटलंय, त्यामुळे सरकार घाबरलंय, असा आरोप अरविंद सावंतांनी केलाय. ५ मे २०२२ रोजी वेदांताने स्वारस्य अभिव्यक्ती केली होती. 14 मे 2022 रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे गुंतवणुकीबाबत अर्ज सादर केला होता, मग काहीच झालं नाही कसं म्हणता? असा प्रश्न खासदार अरविंद सावंत यांनी उपस्थित केला.

मुंबईतील जोगेश्वरी भागात राहणारे संतोष अशोक गावडे यांनी माहिती अधिकारात वेदांता फॉक्सकॉन बद्दलची माहिती मागितली होती. नेमकं या माहिती अधिकारात काय विचारण्यात आलं होतं आणि त्याला काय उत्तर देण्यात आली ते पाहुयात.

प्रश्न – वेदातांने केलेल्या अर्जाची तारीख
उत्तर -वेदांताने ५ जानेवारी २०२२ आणि ५ मे २०२२ रोजी प्रकल्पाबाबत स्वारस्य अभिव्यक्ती (प्रकल्प उभारण्यासंदर्भात इच्छा व्यक्त) केली होती. वेदांताने १४ मे २०२२ रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे गुंतवणुकीबाबत अर्ज सादर केला.

प्रश्न -वेदांसाठी झालेली उच्च स्तरीय कमिटीची तारीख
उत्तर – १५ जुलै २०२२ रोजी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय समितीची बैठक घेण्यात आली.

प्रश्न – नवीन सरकार आल्यानंतर झालेला पाठपुरावा
उत्तर –

* १४ जुलै २०२२ आणि १५ जुलै २०२२ रोजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी वेदांता कंपनीस पत्र लिहून महाराष्ट्रामध्ये गुंतवणुकीसाठी पाचारण केलं.
* १५ जुलै २०२२ रोजी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय समितीची High power committee (HPC) बैठक घेण्यात आली.
* २६ जुलै २०२२ रोजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी वेदांता आणि फॉक्सकॉन कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यामध्ये वेदांताचे जागतिक व्यवस्थापकीय संचालक आकर्ष हेब्बर यांचा समावेश होता.
* मुख्यमंत्र्यांनी २६ जुलै २०२२ रोजी वेदांता ग्रुपचे चेअरमन अनिल अगरवाल यांना पत्र लिहून सामंजस्य करार करण्यासाठी आमंत्रित केलं.
* २७ व २८ जुलै २०२२ रोजी फॉक्सकॉन कंपनीच्या प्रतिनिधींसोबत तळेगाव, टप्पा क्र. ४ येथे भेट देण्यात आली. प्रस्तावित जमिनीची व उपलब्ध सुविधांची पाहणी करण्यात आली. त्यामध्ये आंध्रा डॅम, जल शुद्धीकरण केंद्र व पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांचा समावेश होता. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी या स्थळ पाहणीसाठी उपस्थित होते. कंपनीच्या प्रतिनिधींसोबत जेसीबी, विटेस्को, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा व मर्सिडीज् या कंपन्यांना भेट देण्यात आली.
* या भेटीत तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधा आणि औद्योगिक परिसंस्थेबाबत कंपनीच्या वरिष्ठ प्रतिनिधींशी चर्चा करण्यात आली.
* सदर मुक्कामी दौऱ्यात फॉक्सकॉन कंपनीच्या प्रतिनिधींना पुणे शहरातील निवासी संकुले, हॉटेल्स, मॉल्स व शैक्षणिक सुविधा दाखवण्यात आल्या. त्यामध्ये पुणे विद्यापीठ, आयसर, फ्लेम युनिव्हर्सिटी, सिम्बॉयसिस स्कील युनिव्हर्सिटी इत्यादींचा समावेश होता.
* ५ ऑगस्ट २०२२ रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेदांता ग्रुपचे चेअरमन अनिल अगरवाल यांची मुंबईमध्ये भेट घेतली व प्रस्तावित प्रकल्पाला शासनाचा पूर्ण पाठिंबा व्यक्त केला.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Vedanta project will be a boomerang on Shinde government check details 02 November 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Vedanta Project(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या