बिहार : मोदींशी वाढती जवळीक नितीश कुमारांना महागात पडताना दिसत आहे. कारण जोकिहाट विधानसभेच्या जागेवर नितीश कुमारांचा पक्ष जनता दल युनायटेडचे उमेदवार मुर्शिद आलम यांना आरजेडीचे उमेदवार शहनवाज़ आलम यांनी तब्बल ४१,२२४ मतांनी पराभवाची धूळ चारली आहे.
सुशासनासाठी प्रसिद्ध असून सुद्धा नितीश कुमारांना मोदींची जवळीक महागात पडताना दिसत आहे. आरजेडीच्या सोशल इंजिनीरिंग पुढे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार अक्षरशः नापास होत आहेत. त्याचाच प्रत्यय जोकिहाट विधानसभेच्या निवडणुकी दरम्यान आला आहे.
आरजेडीच मुस्लिम कार्ड सफल होत असून त्याचा प्रत्यय अररिया लोकसभा पोटनिवडणुकी दरम्यान सुद्धा आला होता. एकूणच स्थानिक राजकीय पक्ष भाजपला चांगलेच हैराण करत असून, त्याची मोठी किंमत आगामी निवडणुकीत भाजपला मोजावी लागू शकते असं संकेत या निवडणुकीतून मिळत आहेत.
