7 May 2025 4:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

राफेल घोटाळ्यात मोदींना कोणीही वाचवू शकत नाही: राहुल गांधी

नवी दिल्ली : लढाऊ विमान राफेल घोटाळयात मोदींना कोणी सुद्धा वाचवू शकत नाही. पंतप्रधानांनी रिलायन्सच्या अनिल अंबानी यांना केवळ व्यक्तीगत फायदा मिळावा म्हणून हा घोटाळा केला आहे. दरम्यान, या आरोपांचा काँग्रेस अध्यक्षांनी पुनरुच्चार केला आहे. तसेच विद्यमान CBI संचालक आलोक वर्मांना राफेल लढाऊ विमानांच्या कराराची चौकशी करायची होती. म्हणून मोदी सरकारने त्यांना अचानक मध्यरात्रीपदावरुन दूर करत सक्तीच्या रजेवर धाडले असे सुद्धा ते म्हणाले. त्यामुळेच मोदी लोकसभेत चर्चेपासून पळ काढाला, असा घणाघात काँग्रेस अध्यक्षांनी केला आहे.

दरम्यान, फ्रान्सकडून राफेल फायटर विमानांचा ताबा मिळण्याआधीच पंतप्रधानांनी डासू एव्हिएशनला २०,००० कोटी रुपये दिले. परंतु, HALची देणी द्यायला ते स्पष्ट नकार देतात या कडक शब्दात काँग्रेस अध्यक्षांनी पंतप्रधानांवर सडकून टीका केली आहे. तसेच राफेल लढाऊ विमान मिळण्याआधीच पंतप्रधानांनी डासूला २०,००० कोटी दिले, परंतु HAL ला १५,७०० कोटी रुपये देण्यास ते स्पष्ट नकार देतात.

त्यामुळेच HALला कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी १,००० कोटींचे कर्ज घ्यावे लागते, असे काँग्रेस अध्यक्ष म्हणाले. तसेच पैसे न देऊन HAL ला कमजोर करण्याची मोदी सरकारची मोठी रणनिती आहे. HALच्या रुपाने भारताची रणनितीक क्षमता पूर्णपणे नष्ट करुन, त्यांना केवळ अनिल अंबानींना गिफ्ट द्यायचे आहे. आणि हाच त्यांचा मुख्य कट असून तो आम्ही हाणून पाडण्याचा जोरदार प्रयत्न करत आहोत, असे काँग्रेस अध्यक्षांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या