22 October 2021 11:27 AM
अँप डाउनलोड

अनंत गीतेंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांकडून महाविकास आघाडीत 'राजकीय तेल' ओतणारी प्रतिक्रिया

Devendra Fadnavis

मुंबई, २१ सप्टेंबर | शिवसेनेचे माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी शरद पवार आणि आघाडीवर केलेल्या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अनंत गीते यांचं विधान सत्य परिस्थितीवर आधारित आहे. मी पहिल्यापासून सांगतोय की हे अनैसर्गिक युती आहे, यांचं सरकार नीटपणे चालू शकत नाही, असं फडणवीस म्हणाले.

BhagyaVivah Marathi Matrimonial

अनंत गीतेच्या वक्तव्यानंतर फडणवीसांकडून महाविकास आघाडीत ‘राजकीय तेल’ ओतणारी प्रतिक्रिया – Devendra Fadanvis statement over Shivsena leader Anant Geete criticism on Congress :

शिवसेना नेते अनंत गीते यांनी दोन काँग्रेस एका विचाराची होऊ शकत नाही, तर शिवसेना काँग्रेस एकविचाराची कदापी होऊ शकणार नाही, असं विधान करून खळबळ उडवून दिली आहे. गीते यांच्या या विधानाला भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी हवा दिली. त्यानंतर आता फडणवीसांनीही प्रतिक्रिया दिली आहे. गीतेंनी केलेलं वक्तव्य ही सत्य परिस्थिती आहे. अशी अनैसर्गिक आघाडी कधी चालू शकत नाही, असं फडणवीस म्हणाले.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, “मी पहिल्यापासून सांगतोय कि महाराष्ट्रात तीन पक्षांची झालेली आघाडी ही अनैसर्गिक आहे. अशा प्रकारची ही आघाडी कधी चालू शकत नाही, असं सांगत फडणवीस यांनी महा विकास आघाडी सरकारला फटकारले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Devendra Fadanvis statement over Shivsena leader Anant Geete criticism on Congress.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(676)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x