15 May 2021 4:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ऑक्सिजन गळती दुर्घटनेच्या १० दिवसांनी नाशिकमध्ये प्रकटलेले, पण चंद्रकांतदादा म्हणाले फडणवीस आणि मी.... कोणत्या फेक न्यूज फॉलो करते ही? | म्हणाली, समजलं की ते गंगा नदीतील नाही तर नाजयेरियातील फोटो राजकीय विरोधकांचा 'छळ' ही एकमेव 'टूलकिट' मोदी, शहा आणि आदित्यनाथ वापरतात - काँग्रेस राज्याला अधिक मदत द्या असं फडणवीसांकडून मोदींना एकही पत्र नाही, पण सोनिया गांधींना पत्र लिहिण्यास वेळ काढला फडणवीसजी सरकार लोकांचे जीव वाचविण्यात व्यस्त, तुम्ही भाजपची माशा मारण्याची स्पर्धा भरवत बसा - राष्ट्रवादी ज्याचं अग्नी दहन व्हायला हवं होतं, त्यांना दफन केलं जातंय, तुम्ही कसले हिंदू रक्षक - काँग्रेस महाराष्ट्र सरकारची लस खरेदी निविदा मोदी सरकारने परवानगी न दिल्याने रखडली
x

डिजिटल प्रगती! ई-कॉमर्स क्षेत्रावर नियमावली लादून, स्वतःच्या अँपवरून ई-कॉमर्स थाटणारे पहिले पंतप्रधान

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नमो अँपवरून सलग ३ महिन्यांमध्ये तब्बल ५ कोटींच्या वस्तुंची विक्री करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपलेल्या असताना “नमो अगेन” म्हणजेच ‘पुन्हा एकदा नमो’ या मोहिमेअंतर्गत वेगवगेळ्या वस्तू या अँपवरून विकण्याचा सपाटा लावला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

यामध्ये एकूण विक्रीत अगदी स्वतःच्या ब्रॅण्डिंगचे टी-शर्ट, पेन अशा अनेक गोष्टी विकण्यात येत आहेत. सगळं ९० दिवसांमध्ये या अँपवरून १५ लाख ७५ हजार वस्तूंची विक्री झाली आहे. निवडणुकीच्यावेळी या आकड्यात वाढ होण्याची शक्यता अधीक आहे. या वस्तूंची सर्वाधिक खरेदी भाजपप्रणीत राज्यातून असल्याने यांचे ग्राहक हे भाजपचेच समर्थक अधिक असण्याची शक्यता अधिक आहे.

वास्तविक पंतप्रधानांच्या अँपवरून विक्री केल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये देशातील प्रसिद्ध विषयांना अनुसरण काही विक्री होत असेल आणि ते देशहितासाठी वापरलं जाणार असेल तर समजू शकलो असतो. परंतु, यामागे कोणताही सामाजिक उपक्रम नसून केवळ पक्षनिधी उभारण्यासाठी व्यक्तिगत मार्केटिंगच्या वस्तू विकण्यात येत आहेत. पंतप्रधान मोदींनी सुरु केलेल्या डिजीटल इंडियाचा फायदा त्यांच्याच वस्तूविक्रीला अधिक झाल्याचे दिसून येत आहे.

काही दिवसांपूर्वी युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणीसारख्या नेत्यांनी नमो ब्रॅण्डच्या वस्तू घेण्याचे आवाहन त्यांच्या समर्थकांना केले आहे. त्यानंतर नमो ब्रॅण्डच्या वस्तूंचा खप वाढल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे हिमाचल प्रदेशमधून भाजपाचे खासदार असलेल्या अनुराग ठाकूर आणि सामाजिक न्याय मंत्र्यांना ‘नमो अगेन’ची टीशर्ट घालून ट्विटवर फोटो पोस्ट केले आहेत. विशेष म्हणजे बाजारात विक्रेत्याला सर्वाधिक मार्जिन म्हणजे फायदा देणारी वस्तू म्हणजे गारमेंट आणि त्याचाच सर्वाधिक समावेश या अँपवरील वस्तूंमध्ये करण्यात आला आहे. फक्त इथे किती टॅक्स दिला जातो आणि यांचे वेंडर कोण ते समजू शकलेलं नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1540)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x