18 November 2019 12:15 AM
अँप डाउनलोड

काही लुख्खे सांगत होते की निलेश राणेला रायगडात येऊ देणार नाही, मी तर आलो

रायगड : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते तसेच माजी खासदार नीलेश राणे यांनी पुन्हा शिवसेनेवर तिखट शब्दात निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट करताना म्हटलं आहे की, ‘सगळेच शिवसैनिक वाईट नाहीत, पण जे अंगावर येतील त्यांना फेकून टाका, असे त्यांनी कार्यकर्त्यांना थेट आदेशच दिले आहेत.

दरम्यान, रायगडमधील माणगावयेथे रविवारी नीलेश राणे यांनी पक्षाचा जाहीर कार्यक्रम आयोजित केला होता. दरम्यान स्वर्गीय. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केल्याने नीलेश राणे आणि शिवसेनेत काही दिवसांपासून जोरदार जुंपली आहे. याचा समाचार सोमवारी नीलेश राणे यांनी पुन्हा ट्विटद्वारे घेतला आहे. त्यात त्यांनी शिवसैनिकांना उद्धेशून म्हटलं की ‘काही लुख्खे सांगत होते आम्ही निलेश राणेला रायगडात येऊ देणार नाही. त्याच रायगडात जाऊन माणगाव तालुक्यामध्ये काल महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष प्रवेश कार्यक्रम घेतला. काल रायगडात ही मी सांगितलं, सगळे शिवसैनिक वाईट नाहीत, पण जे अंगावर येतील त्यांना सरळ फेकून टाका’, असे ट्विट त्यांनी केले.

काय म्हटलं आहे निलेश राणे यांनी ट्विट मध्ये;

हॅशटॅग्स

#Nilesh Rane(24)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या