19 October 2021 8:54 AM
अँप डाउनलोड

MP Babul Supriyo Joins TMC | भाजपाला राजकारणातून संन्यासाची टोपी लावून खा. बाबुल सुप्रियो तृणमूलमध्ये

MP Babul Supriyo

कोलकाता, १८ सप्टेंबर | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले भाजप खासदार यांनी राजकीच संन्यास घेणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र, आता भाजपला रामराम ठोकत त्यांनी थेट ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. तृणमूल काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ही माहिती देण्यात आली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

भाजपाला राजकारणातून संन्यासाची टोपी लावून खा. बाबुल सुप्रियो तृणमूलमध्ये – Former union minister and MP Babul Supriyo joins Trinamool Congress in presence of TMC National General Secretary Abhishek Banerjee :

माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार बाबुल सुप्रियो आज राष्ट्रीय महासचिव अभिषेक बॅनर्जी आणि राज्यसभा खासदार डेरेक ओब्रायन यांच्या उपस्थितीत तृणमूल परिवारात सहभागी झाले’, असं ट्वीट तृणमूल काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरुन करण्यात आलं आहे.

बाबुल सुप्रियो यांनी दोन महिन्यांपूर्वी राजकारण सोडण्याची घोषणा केली होती. त्यांनी फेसबुकवरून ही घोषणा केली होती. तसेच त्यांनी खासदारकीचा राजीनामाही दिला होता. मोदी सरकारच्या विस्तारात सुप्रियो यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे ते नाराज होते. या नाराजीतूनच त्यांनी राजीनामा दिला असावा अशी चर्चा होती.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Former union minister and MP Babul Supriyo joins Trinamool Congress.

हॅशटॅग्स

#TMC(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x