7 May 2025 3:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

ऑगस्टा गौप्यस्फोट: हॅश्केची कबुली, 'गांधी घराण्याचे नाव घेण्यासाठीच आमच्यावर दबाव'

मुंबई : बहुचर्चित ऑगस्टा वेस्टलॅण्ड या हेलिकॉप्टर बनविणार्‍या कंपनीचा दलाल गुईडो हॅश्के याने मोठा गौप्यस्फोट केला आहे. दरम्यान, या हेलिकॉप्टर खरेदी-विक्री व्यवहारात भारतातील गांधी घराण्याला लाच मिळाली हे सांगण्यासाठीच माझ्यावर मोठा दबाव आला असा धक्कादायक गौप्यस्फोट त्याने केला आहे. इटलीच्या कोर्टात ‘गांधी घराणे’ आणि ‘अहमद पटेल’ यांचे नाव घ्यावे यासाठी सरकारी वकिलाने मोठ्या चलाखीने माझ्या तोंडून त्यांची नावे वदवून घेण्याचा शिस्तबद्ध प्रयत्न केला. परंतु मी त्यांची ती चलाखी ओळखली आणि कुणाचेही नाव घेतले नाही, असे हॅश्के याने एका इंग्रजी मासिकाला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे.

हा प्रसंगाचे संपूर्ण स्पष्टीकरण हॅश्के यांनी मुलाखतीत दिले, ‘२०१६ साली इटालियन कोर्टात मला या प्रकरणातील साक्षीदार म्हणून सरकारी वकिलाने मला मोठ्या चलाखीने प्रश्‍न विचारले होते. दरम्यान, प्रश्न विचारते वेळी त्याने एका भारतीय व्यक्‍तिचं छायाचित्र माझ्या चेहर्‍यासमोर धरलं आणि प्रश्न विचारले “तू या व्यक्तीला ओळखतोस? केवळ हो की नाही!’ त्यावर मी म्हणालो, ‘नाही.’ कारण त्या फोटोतील व्यक्तीला मी आयुष्यात पहिल्यांदाच पहात होतो. म्हणून शेवटी मीच न्यायाधीशांना विचारले, “कोण आहे हा माणूस?” आणि त्यानंतर त्या वकिलाचा चेेहरा अगदी बघण्यासारखा झाला.

दरम्यान, ती व्यक्ती म्हणजे अहमद पटेल होती हे मला नंतर समजलं, परंतु त्याआधी काहीच माहीत नव्हते. केवळ एका चिठोर्‍याला भारतातील सरकार फार मोठा पुरावा समजत आहे. ही तथाकथित ‘बजेट नोट’ पोलिसांनी स्वित्झर्लंडमधील माझ्या घरी जाऊन माझ्या जन्मदात्या आईकडून त्यांनी हा तो चिठोरा मिळविला. दरम्यान, त्याच चिट्ठीवर ‘एपी’ आणि ‘फॅम’ अक्षरे आहेत. परंतु, त्यावर कुणाचे सुद्धा हस्ताक्षर नाही. तसेच या नोटमध्ये ३० दशलक्ष युरोपमधील ५० टक्केपेक्षा जास्त रक्‍कम ‘एपी’ आणि ‘फॅम’ यांना दिल्याची माहिती असल्याचे सांगणे हे खूप ‘हास्यास्पद’ आहे, असे गुईडो हॅश्के याने सांगितले.’

दरम्यान, गुईडो हॅश्के याने कथन केलेला संपूर्ण घटनाक्रम मोदी सरकारला तोंडघशी पडणारा आहे असे राजकीय विश्लेषकांना वाटत आहे. त्यामुळे यावर काँग्रेस पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या