नवी दिल्ली : आयसीआयसीआय बँकेच्या माजी एमडी आणि सीईओ चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडियोकॉन समूहाचे चेअरमन वेणुगोपाल धूत यांच्यावर FIR दाखल करणाऱ्या CBI अधिकाऱ्याची दुसऱ्याच दिवशी १२५० किलोमीटर दूर बदली करण्यात आली आहे.
एसपी सुधांशु मिश्रा हे दिल्लीतील बँकिंग आणि सेक्युरिटी फ्रॉड सेल’मध्ये कार्यरत होते. २२ जानेवारी रोजी त्यांनी चंदा कोचर यांच्या विरुद्ध FIR दाखल केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांची बदली रांची येथील इकोनॉमिक ब्रांच’मध्ये करण्यात आली आहे. विशेष म्हणजे चंदा कोचर यांच्यावर कारवाई झाल्यावर उपचारासाठी अमेरिकेत असलेले अरुण जेटली यांनी अशा परिथितीत एक ब्लॉग लिहून तो प्रसिद्ध केला आणि एकप्रकारे संबंधित कारवाईवर नाराजी व्यक्त केली होती.
त्यानंतर पडद्याआड अनेक घडामोडी घडल्याचे समोर येत होते. त्याचाच हा प्रत्यय असल्याची चर्चा विरोधकांमध्ये रंगली आहे. सदर अधिकाऱ्याच्या बदलीनंतर काँग्रेसने सुद्धा यावर टीका करत सत्ताधाऱ्यांवर आणि विशेष करून अरुण जेटलींना लक्ष करत ते दुपट्टी भूमिका घेत असल्याचं म्हटलं आहे.
