13 December 2024 12:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

राज ठाकरेंसारखा सर्वात हाय टीआरपी असलेला अध्यक्ष मनसेकडे, मग चुकतंय कुठे? सविस्तर

मुंबई : स्वरराज श्रीकांत ठाकरे अर्थात महाराष्ट्राला आणि देशाला माहित असलेले राजकीय नेते म्हणजे राज ठाकरे. केवळ मनसेची स्थापना झाल्यापासूनच नव्हे तर शिवसेनेत असताना देखील स्वर्गीय. बाळासाहेबानंतर राज्यातील शिवसैनिकांना सुद्धा पक्षाच्या सभेसाठी तसेच प्रचारासाठी हवा असणारा त्यावेळचा सर्वात तरुण चेहरा. सध्या राज्याच्या राजकारणात राज ठाकरे म्हणजे हाय टीआरपी असलेले राजकीय नेते हे नाकारून चालणार नाही. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा स्वतंत्र पक्ष स्थापन करून जवळपास १३ वर्ष झाली आहेत. परंतु, राज ठाकरेंसारखा प्रघल्भ, सामाजिक – राजकीय ज्ञान आणि भान असलेलं अभ्यासू व्यक्तिमत्व तसेच हृदयाला भिडणारी भाषण शैली, असे सर्व सद्गुण असलेला अध्यक्ष मनसेला लाभला आहे. तरी आज सुद्धा पक्ष अस्तित्वासाठीच का झटतो आहे? याचा आम्ही मागोवा घेण्याचा एक प्रयत्न करत आहोत. कारण, प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारणं असतात आणि त्याचा सखोल शोध घेणे सुद्धा त्या नेत्याचे कर्तव्य असते, जो ते करतही असतील… तरी आमच्या टीमने केलेली बारीक निरीक्षणं आज सविस्तर मांडत आहोत.

अगदी इतर राज्यांमधील २-३ वर्षांपूर्वी छोट्या-मोठ्या कारणाने जन्माला आलेले राज्यस्थरीय पक्ष सुद्धा खासदार आणि आमदारांच्या आकड्यांच्या खेळीत दिल्लीश्वरांना हैराण करून सोडताना दिसतात. महाराष्ट्राबद्दलच बोलायचे झाल्यास राजू शेट्टींचा स्वाभिमानी पक्ष, शेकाप, एमआयएम, बहुजन विकास पक्ष किंवा अगदी छोटे माहित नसलेले अपक्ष देखील, यंदा खासदार निवडून आणतील अशी आकडेवारी प्रसार माध्यम दाखवतात, पण त्यात मनसेचा उल्लेख देखील नसतो किंवा गृहीतच धरत नाहीत, असं चित्र आहे. विशेष म्हणजे त्यासर्व पक्षांकडे राज ठाकरेंशी तुलना करावी असा प्रघल्भ अध्यक्ष नसताना देखील ते यश कसे प्राप्त करतात, हा प्रश्न सुद्धा येतो. त्यात सर्वात महत्वाचं म्हणजे, सामान्यांसाठी या ना त्या कारणासाठी रस्त्यावर उतरणारी आक्रमक कार्यकर्त्यांची फौज सुद्धा राज ठाकरे यांच्याकडे आहे, जी इतर पक्षांकडे नाही. मग नक्की चुकतंय कुठे असा प्रश्न नक्कीच निर्माण होतो.

अगदी मनसेच्या ६-७ वर्षांपूर्वी काँग्रेसमधून फुटून जन्माला आलेला शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील हमखास ४०-५० आमदार आणि ८-१० खासदार निवडून आणताना दिसतो. अर्थात प्रत्येक पक्षाचा गाभा आणि संदर्भ निरनिराळे असले तरी राजकारणात केवळ आकडेच कामी येतात हे वास्तव आहे. नेमका त्याच आकडेवारीचा विचार करता शरद पवार यांनी सहकार क्षेत्राच्या आडून ग्रामीण महाराष्ट्रात हमखास निवडून येतील, अशा नेते मंडळींची मोट बांधली. त्यातील बहुतेक नेते मंडळी ही शरद पवारांच्या मदती शिवाय आमदार किंवा खासदार म्हणून निवडून येण्यास सक्षम होती आणि आजही आहेत. त्याउलट राज ठाकरेंचे २००९ मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले नेते त्यावेळी सुद्धा राज ठाकरेंवरच अवलंबून होते. तसेच सध्या पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा काही अंश सोडला तर पक्षात अनेकजण मित्रमंडळीच भरलेली दिसतात, जे आजही राज ठाकरे यांच्या करिष्म्यावरच अवलंबून दिसतात. आज बाळा नांदगावकर, प्रमोद पाटील, अविनाश जाधव, अभिजित पानसे, राजू उंबरकर, वैभव खेडकर आणि अजून काही मोजकेच वरिष्ठ पदाधिकारी प्रत्यक्ष जमिनीवर उतरून कार्यकर्त्यांची साथ देताना दिसतात. परंतु, राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात आजच्या घडीला सामान्यांसाठी मैदानात उतरणारी आक्रमक कार्यकर्त्यांची फौज मनसेकडे असली, तरी प्रत्येक जिल्ह्यात कार्यकर्त्यांना स्वतः सोबत भावनिक बांधून ठेवणारे प्रमोद पाटील, अविनाश जाधव, अभिजित पानसे, राजू उंबरकर आणि वैभव खेडकर यांच्यासारखी रस्त्यावर उतरणारी नेते मंडळी नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते असून सुद्धा पक्ष नसल्यासारखा जाणवतो आणि प्रसार माध्यमं त्याबाबतीत चोख भूमिका बजावतात.

आजच्या घडीला स्वतः राज ठाकरे, सामान्यांसाठी रस्त्यावर उतरणारे आक्रमक कार्यकर्ते आणि वरिष्ठ लढाऊ पदाधिकारी असं सर्वकाही मनसेकडे असताना, इतर पक्षांकडे असलेली एक गोष्ट आजही मनसेकडे नाही आणि तो एकमेव गोष्ट म्हणजे मनसेकडे स्वतःचा ‘पारंपरिक मतदार’च नाही. पक्षाने हे कितीही नाकारलं तरी हे वास्तव आहे आणि हेच मूळ कारण आहे की मनसेसोबत युती किंवा आघाडी करण्यास कोणी तयार होत नाही. आघाडीबाबत मनसेची उत्तर भारतीयांबाबतची भूमिका हे कारण दिलं जात, वास्तविक ती एक पळवाट आहे. युती किंवा आघाडी त्याच पक्षासोबत सत्यात उतरते, ज्यांना स्वतःची पारंपरिक मतदार पेटी आहे, मग ती कोणत्याही समाजाची, धर्माची, भाषिकांची का असेना. मनसे आजही खात्रीने सांगू शकत नाही की सर्व मराठी किंवा मराठी मतदार आम्हाला मोठ्या प्रमाणावर मतदान करतात. मराठी माणसासाठी कृष्णकुंज म्हणजे केवळ संकट समयी लागणारी एक ‘हेल्पलाईन’ झाली आहे. तर इतर पक्ष कधीच ‘हेल्प’ करायला धावणारे नसले तरी निवडणुकीच्यावेळी ‘हेल्पलेस’ पक्षांनाच लोकं ‘पारंपरिक मतदार’ पेटीच्या नावाने मतदान करतात हे वास्तव आहे.

पारंपरिक मतदार होत नसतो तर तो निर्माण करायचा असतो आणि ती एक मोठी प्रक्रिया असते, ज्यासाठी २००९ नंतरच्या यशानंतर कधी प्रयत्नच केले गेले नाहीत. मनसेला आज निवडणुका झाल्या तर, आज पक्षाबद्दल लोकांमध्ये काय हवा आहे, यावरून त्यांना मतदान होतं. जस २००९च्या निवडणुकीत झालं होतं आणि त्याविरुद्ध २०१४ मध्ये जी हवा विरोधकांनी आणि विशेष करून शिवसेनेने आयत्या वेळी पेरली, त्यामुळे मोदींना समर्थन देऊन सुद्धा मनसेच्या बाबतीत वेगळेच निकाल लागले. कारण मनसे आणि राज ठाकरेंबद्दल संभ्रम निर्माण करणारी नकारात्मक हवा शिवसेनेच्या चाणक्यांनी शिस्तबद्ध पेरली होती. त्यामुळे २०१९ मधील लोकसभा असो किंवा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पक्ष होकारात्मक हवा टिकवून ठेवण्यात किती यशस्वी होतो, त्यावर यश अवलंबून असणार आहे.

त्यात मनसे समाज माध्यमं आणि तंत्रज्ञानाच्या रणनीतीत आणि वापरात नापास होताना दिसत आहे. समाज माध्यमांवरील पक्षाच्या ग्रुपवर आपल्याच कार्यकर्त्यांमध्ये विषय फिरत ठेवणे आणि ठराविक त्याच-त्याच लोकांनी विरोधकांच्या पोस्टवर कमेंट केल्याने पक्षाची मतपेटी वाढणार नाही, हे आधी समजून घ्यावे. त्यात फसेबूकवरून भारतातील तब्बल ३० टक्के महिलांनी काढता पाय घेतला आहे आणि देशात १० कोटीच्या वर अधिक फेक अकाउंट असल्याचे स्वतः फेसबूकनेच मान्य केले होते. त्यात पक्षाला समाज माध्यमांवर ‘डेटा युटिलायझेशन’ म्हणजे नेमकं काय? हे सांगणारे तज्ज्ञच नसल्याचे मनसेचा अभ्यास केल्यावर ध्यानात येते किंवा जे असतील ते स्वतःला तज्ज्ञ असल्याचे भासवत असावेत असंच रिझल्ट सांगतात. कारण आज देशात प्रत्येक १० तरुणांपैकी ४ जण तरी समाज माध्यमं तज्ज्ञ नजरेस पडतात. तंत्रज्ञानाशी कोणताही संबंध नसलेली तरुण मंडळी आज सऱ्हासपणे स्वतःला तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी समाज माध्यम आणि SEO तज्ज्ञ असल्याचा शिक्का लावून अनेकांना टोप्या लावत फिरत आहेत.

अगदी उदाहरण द्यायचे झाले तर राज ठाकरेंसारखा प्रचंड टीआरपी असणाऱ्या नेत्याची फेसबुक फॉलोवर्स संख्या आजही केवळ साडेआठ लाखाच्या घरात आहे. विशेष म्हणजे ते एकमेव असे नेते आहेत, ज्यांचं फेसबुक पेज लॉन्चिंग इव्हेंट झाला होता. पण त्याउलट ज्यां राजकीय नेत्यांना ऐकण्यासाठी घरातील माणसं देखील येतील का याची शास्वती देता येणार नाही, अशा अनेक नेत्यांचे समाज माध्यमांवर ४५-५० लाख फॉलोअर्स असल्याचे दिसते. परंतु, हे राज ठाकरे यांचे फेल्युअर नसून, त्यांच्या समाज माध्यम हाताळणाऱ्यांचं फेल्युअर आहे. आमच्या समाज माध्यम तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासात राज ठाकरेंचे आजच्या घडीला कमीत कमी २-३ कोटी फॉलोअर्स असले असते, त्यामुळे त्यांचा राज्यभरात ‘रिच’ वाढला असता. दुसरं म्हणजे देशातील आणि राज्यातील सर्व प्रमुख नेते त्यांच्या व्यक्तिगत फेसबुक आणि ट्विटर पेजवरून पक्षाबद्दलच्या होकारात्मक बातम्या रोज शेअर करून पक्षाची जनमानसात प्रतिमा उंचावताना दिसतात. त्यामुळे त्या शेअर केलेल्या डिजिटल न्यूजला अधिक वाचक मिळतात आणि त्यांचा कमर्शियली फायदा होतो, परिणामी ते त्यांच्याबद्दल अधिक चांगलं लिहिण्यास प्रवृत्त होतात. कारण जस प्रिंट मीडियामध्ये अधिक जाहिरातींसाठी अधिक वाचक महत्वाचा असतो, तसा डिजिटल मीडियामध्ये सुद्धा जास्त कमाईसाठी जास्तीत जास्त ऑनलाईन ट्रॅफिक महत्वाचं असतं, ते इतर राजकारण्यांच्या पेजवरून या डिजिटल न्यूजला मिळत आहे. जे राज ठाकरे यांच्या व्यक्तिगत पेजवरून पक्षासंबंधित होकारात्मक बातम्यांच्या बाबतीत कधीच होताना दिसत नाही. ही सर्व ऑनलाईन प्रसार माध्यमांच्या धंद्याची बात आहे, जी मनसेच्या तांत्रिक टीमच्या डोक्याला स्पर्श करत नसावी किंवा राज ठाकरे यांना ते पसंत नसावं, असं दिसतं. त्यामुळे कितीही चांगलं केलं तरी प्रिंट मीडियासुद्धा नकारात्मक बातम्या छापतात, तर डिजिटल मीडिया टिंगल टवाळी करणाऱ्या बातम्या, हे अनेक वेळा पाहायला मिळते.

आज अमित ठाकरेंची तरुण पिढी सक्रिय राजकारणात उतरली असताना देखील तंत्रज्ञान हा विषय ग्रँटेड धरल्याचे सहज दिसते. अगदी उदाहरण द्यायचे झाले तर mnvsena.org या वेबसाईटचे अनॅलिटीक्स पाहिल्यास त्यांना ट्रॅफिकच नसल्याचे दिसते. तर दुसरीकडे चांगले विषय असून देखील mnsblueprint.org सारख्या वेबसाईटची अवस्था सुद्धा तीच आहे. तंत्रज्ञानाच्या भाषेत बोलायचे तर वेबसाईटवर ट्रॅफिक येत नसतं तर आणायचं असतं. त्यासाठी टीम काहीच करताना दिसत नाही. तसेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि यूजर एंगेजमेंट या महत्वाच्या फीचर्सचा मनसेच्या एकाही वेबसाईट्शी संबंध नाही. त्यात आज रोज कोणीतरी उठून, पक्षाच्या नावाने एखादा वेबसाइट तज्ज्ञ घेऊन येतो आणि पक्षाच्या नावाने नवनवीन डिजिटल न्युज बनवत आहेत. मुळात आज अनेक स्वयंघोषित तंत्रज्ञान तज्ज्ञ themeforest.net/search/news या वेबसाइटवरून २-३ हजारात एखादी रेडिमेड स्क्रिप्ट खरेदी करतात आणि १०० जणांना तेच तेच विकून लाखो रुपये उकळतात. त्यामुळेच जगभर ब्लॉग्स आणि वेबसाइट्सचा सुळसुळाट झाला आहे. वास्तविक यात कुठेही आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि यूजर एंगेजमेंट नसतं, त्यामुळे कालांतराने त्या वर्च्युअली कोमात जातात. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या बाबतीत पक्ष फेल आहे असच म्हणावं लागेल. परंतु, त्याला राज ठाकरे किंवा पदाधिकारी कारणीभूत नसून, पक्षाचे तंत्रज्ञान तज्ज्ञ किंवा चुकीचे सल्लागार किंवा तंत्रज्ञान तज्ञांनाच ते माहित नसावं, अशी शक्यता आहे. त्यामुळे याविषयी वेळीच खबरदारी घेतली न गेल्यास तंत्रज्ञानाच्या बाबतीत भविष्यकाळ खरंच कठीण आहे. कारण तंत्रज्ञान नेहमी सुपरसॉनिक पद्धतीने काम करतं, जे इतर पक्षांच्या बाबतीत होताना दिसत आहे.

त्यानंतर, आमच्या प्रतिनिधींना प्रसार माध्यमांमधील अनेक पत्रकार मित्र मंडळींच्या तोंडून राज ठाकरे यांच्याबद्दल नेहमीच नकारात्मक अनुभव कानावर पडला. त्यातील अनेक पत्रकार मित्र मंडळींनी सर्वाधिक ऐकवल्याचा प्रकार म्हणजे, ‘ते नेहमीच रागीट भाषेत बोलतात, अपमानित करतात, तुम्ही त्यांना कितीही चांगले सांगायला जा, ते तुमचं पूर्ण ऐकूनच घेण्याआधीच विषयाला पूर्णविराम देताना दिसतील’ असे अनुभव पत्रकारांनी शेअर केले. परंतु, महाराष्ट्रनामाच्या प्रतिनिधींणींचा जेव्हा काही राजकीय कारणास्तव मनसेच्या नैतृत्वाशी थेट संपर्क साधण्याची संधी मिळाली तेव्हा, पत्रकारांचा तो निष्कर्ष आमच्या अनुकरणातून चुकीचा वाटला. कारण राज ठाकरेंच्या ज्या स्वभावाला पत्रकार मित्र रागीट समजतात, ती आम्हाला त्यांची संवाद साधण्याची नैसर्गिक शैली वाटली आणि नेमकं त्यालाच पत्रकार अपमान समजतात आणि त्याचच रूपांतर अनेकवेळा पक्षाबद्दलच्या नाकाराम्तक बातम्यांमध्ये होताना दिसतं. परिणामी जनमानसाची चांगली कामं करून देखील पक्षाबद्दल चुकीच्या बातम्या अधिक पसरताना दिसतात. त्यामुळे पक्षात वरपासून ते खालपर्यंत, मीडिया मॅनेजमेंट चांगल्या दिशेने असणे गरजेचे आहे.

त्यानंतर सर्वात शेवटचा आणि महत्वाचा विषय म्हणजे पक्षाचं चिन्ह रेल्वे इंजिन. आजच्या घडीला राज ठाकरे माहित नसलेली व्यक्ती राज्यात सापडली तर नवल म्हणावं लागेल. परंतु, त्याच राज ठाकरेंच्या मनसेचं पक्ष चिन्ह अनेकांना आजही माहित नाही हे वास्तव आहे. आमच्या टीमने असे अनेक मतदार अनुभवले ज्यांना राज ठाकरे आवडतात, परंतु त्यांना पक्षाचं चिन्ह आजही माहित नाही. त्यात, निवडणुकीच्या आयत्यावेळी ‘रोडरोलर’ सारखी चिन्ह अपक्षांना मिळाली की ईव्हीएम मशीनवर ‘इंजिन आणि रोडरोलर’ची टक्कर व्हायला लागते. मनसेने निवडणूक चिन्हा पेक्षा झेंड्याला अधिक महत्व दिले तिथेच चूक झाली आणि पक्षाच्या झेंड्यात रेल्वे इंजिन असलेले झेंडे आंदोलनाच्या वेळी खूप कमी वापरले गेले. राज ठाकरे हेच पक्षाचा चेहरा असले तरी ‘रेल्वे इंजिन’ म्हणजेच राज ठाकरे ही संकल्पना धृड होणं गरजेचं होतं. त्यामुळे कार्यकर्त्यांनी समाज माध्यमांवर राज ठाकरेंचा प्रोफाइल फोटो ठेवण्यापेक्षा इंजिन प्रोफाइल फोटो ठेवल्यास ते अधिक फायद्याचं झालं असतं. दुसरं म्हणजे कार्यकर्ते करणार नाहीत असं नाही, पण त्यांना ब्रॅंडिंगचं तसं महत्व सांगणारे कोणी पुढे आलेच नसावेत. आज मातोश्रीवर भाजपच्या २०१४ मधील सोशल मीडिया रणनीतीचे तज्ज्ञ प्रशांत किशोर येऊन गेले, कारण त्यांना कोणीतरी सल्ला देणार मिळालं असावं आणि पक्ष नैतृत्व त्यात स्वतः कार्यरत झालं आहे. आजही आमच्या टीमला अशी लोकं भेटली, जी राज ठाकरे यांना अशा विषयांवर आपुलकीपोटी मार्गदर्शन करण्यास तयार आहेत, परंतु विषय हाच येतो की राज ठाकरे यांची तशी स्वतःची इच्छा आहे का? कारण आज मातोश्रीवर गेलेले प्रशांत किशोर हे काही देशातील या विषयातील एकमेव तज्ज्ञ नाहीत, जे प्रसार माध्यमांनी पेरले आहे. तसं असतं त्यांना टाटा बायबाय करायला भाजप काही मूर्ख नाही. कारण, शेवटी प्रशांत किशोर सुद्धा कंपनी चालवतात आणि त्यासाठीच ते सुद्धा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर क्लाईंट हंटिंगमध्ये उतरले असणार. त्याचाच प्रत्यय म्हणजे आजची मातोश्री भेट, असल्याचे म्हणावे लागेल. असो! बाकी यातून मनसेने काय तो होकारात्मक बोध घ्यावा, कारण आजही दिल्ली दूर नाही.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x