28 June 2022 12:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
नागपूर-बुटीबोरी मार्गावर 6 पदरी उड्डाणपूल | 15 मिनिटांत 19 किमीचं अंतर कापता येईल - नितीन गडकरी एकनाथ शिंदेंनी बंडखोर आमदारांना या 'गेम प्लॅन' पासून ठेवलंय अंधारात | शिंदे आणि भाजपचा गेम प्लॅन बाहेर येतोय Multibagger Penny Stocks | हा 3 रुपयांचा पेनी शेअर करतोय मालामाल | आजही खरेदीला खूप स्वस्त Inflation Effect | पीठानंतर आता तांदूळ अजून महागणार आहे | तुमच्या किचनचा खर्च वाढणार Multibagger Stocks | तुम्ही सुद्धा असे शेअर निवडा | या शेअरने फक्त 10 महिन्यात 960 टक्के परतावा दिला Demat Deactivated | तुमचे डीमॅट खाते डिऍक्टिव्हेट होईल | फक्त 3 दिवस उरले | हे काम लवकर करा PPF Investment | मुलाच्या नावेही उघडता येईल पीपीएफ खाते | फायद्याच्या योजनेबद्दल जाणून घ्या
x

VIDEO: अमेरिकन प्लॅनेट लॅब्जने बालाकोट मदरसा संकुलाचे सॅटेलाईट व्हिडिओ प्रसिद्ध केले, भारतीय माध्यमं तोंडघशी?

Pakistan, IAF, PAF, Pulawama Attack, Balakot

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी तळ हवाई हल्ल्यात उद्ध्वस्त केल्याचे आणि अनेक दहशतवाद्यांना मारल्याचे भारतीय जनता पक्षाचे नेते खुलेआम दावे करत आहेत. भारतीय वायुदलाने कोण आणि किती जण मृत्युमुखी पडले ते आमचं काम नाही असा अप्रत्यक्ष संदेश दिला होता. तर दुसरीकडे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे मुख्य सचिव विजय गोखले यांनी ती ‘बिगर लष्करी कारवाई’ तसेच ‘प्रतिबंधात्मक कारवाई’ असा शब्दप्रयोग करून सामान्यांना बरंच काही सांगितलं होतं. परंतु. भारतीय प्रसार माध्यमांनी विषय वेगळ्या पद्धतीने चिघळवुन सत्ताधाऱ्यांसाठी लोकसभेच्या अनुषंगाने हवानिर्मिती करण्यास मदत केल्याचं पाहायला मिळालं.

परंतु, आंतरराष्ट्रीय प्रसार माध्यमांनी व्हिडिओ पुराव्यानिशी भारतीय प्रसार माध्यमांची पोलखोल करण्यास सुरुवात केली आहे. वास्तविक आज पर्यंत एकही मृत दहशवाद्यांचा फोटो जगाने पाहिलेला नाही तर काही ठिकाणी पाकिस्तानमधील भूकंपा दरम्यानचे फोटो प्रसिद्ध करून सामान्यांच्या टोळ्यात धुफेक करण्याचे प्रकार आजही सुरु आहेत. दरम्यान बाळकोटच्या मदरसा संकुलात आजही सर्व ६ इमारती जशाच्या ताशा उभ्या आहेत असा दावा रॉयटर्स या वृत्तसंस्थेने उच्चप्रतीच्या उपग्रह छायाचित्रां आणि व्हिडिओच्या आधारे प्रसिद्ध केला आहे.

व्हिडिओ पुरावा आणि विश्लेषण पाहण्यासाठी येथे क्लीक करा

भारताच्या लढाऊ विमानांनी हल्ला केल्यानंतर काही दिवसांनी म्हणजे ४ मार्च रोजी अमेरिकेतल्या सॅनफ्रॅन्सिस्को येथील प्लॅनेट लॅब्ज या खाजगी कंपनीने उपग्रहाद्वारे त्या जागेची छायाचित्रे टिपली आहेत. बालाकोटमध्ये हल्ला झाला त्या ठिकाणची उपग्रहाद्वारे काढलेली उच्चप्रतीची छायाचित्रे आजवर सर्वांसाठी उपलब्ध नव्हती. प्लॅनेट लॅब्जने उपग्रहाद्वारे या जागेची ७२ सेमी इतक्या जवळून छायाचित्रे काढली आहेत. रॉयटर्सने म्हटले आहे की, या जागेच्या एप्रिल महिन्यात व आता काढलेल्या छायाचित्रांत तेथील स्थितीत फारसा फरक पडल्याचे निदर्शनास आलेले नाही. बॉम्बहल्ल्यांमुळे मदरसा संकुलात असलेल्या इमारतींचे नुकसान झाले आहे, भिंती पडल्या आहेत, आजूबाजूची झाडे कोसळली आहेत अशा कोणत्याही खाणाखुणा या छायाचित्रांत आढळून आल्या नाहीत.

विशेष म्हणजे तत्पूर्वी ऑस्ट्रेलियन संस्थांनी देखील असेच सॅटेलाईट पुरावे दिले होते आणि त्यात करण्यात आलेले दावे देखील अमेरिकेतल्या सॅनफ्रॅन्सिस्को येथील प्लॅनेट लॅब्ज या खाजगी कंपनीने उपग्रहाद्वारे त्या जागेच्या दाव्यांबद्दल प्रसिद्ध केलेली माहिती देखील मिळत आहे हे विशेष म्हणावे लागेल.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x