29 September 2020 3:30 AM
अँप डाउनलोड

कोकण: पावसमधील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश

रत्नागिरी : माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे पावस जिल्हा परिषद गट टाकलेवाडी तसेच रत्नागिरी शहरातील वॉर्ड क्रमांक २८ मधील राजीवडा मधील अनेक पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश केला.

BhagyaVivah Marathi Matrimonial

सध्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष संपूर्ण कोकणात पक्ष विस्तारावर अधिक भर देताना दिसत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत पक्ष संपूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याने कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची मजबूत फळी उभी करण्याची पक्षाची योजना आहे.

दरम्यान आजच्या प्रवेशामध्ये पावस जिल्हा परिषद गट टाकलेवाडी येथील समीर पिलणकर, सुशील पिलणकर, विवेक पिलणकर, गणेश पावसकर, महेश भरणकर, उमाजी शिंदे, उदय गुरव, विजय माने, राजेश सुर्वे, मयूर नाईक, सुदेश गजणे, श्रीकांत पावसकर, सचिन पावसकर, प्रदीप शिवणेकर, निथीलेश नार्वेकर तसेच रत्नागिरी शहरातील वॉर्ड क्र. २८ राजीवडा मधील सरफाराज मुजावर, इम्रान वस्ता, समीर वस्ता, जैद सुवर्णदुर्गकर, अजसिद्दीन मुजावर, अकिल सोलकर शाहरुख फनसोफकर, दालीम शेख आदींसह अनेक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात जाहीर प्रवेश केला.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Nilesh Rane(55)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x