17 May 2021 3:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
देशात वादळ आणि कोरोना आपत्ती | त्यात अमृता फडणवीस यांचं सूचक नव्हे तर 'निरर्थक ट्विट' केंद्राने जगभरात लसी फुकट वाटल्या, त्यांच्या पापाचं फळ जनतेला भोगावं लागतंय - रुपाली चाकणकर संपूर्ण पोलीस दल कोरोना आपत्तीत लोकांसाठी कर्तव्यावर | तर राज्याचे पोलीस महासंचालक सुट्टीवर प. बंगाल | सीबीआय'च्या TMC नेत्यांवर धाडी, ममता बॅनर्जी थेट CBI कार्यालयात प. बंगालच्या राज्यपालांकडून खटला दाखल करण्याची परवानगी घेत TMC नेत्यांवर सीबीआयच्या धाडी गेल्या २४ तासांत २ लाख ८१ हजार ३८६ नवे कोरोना रुग्ण | ४,१०६ रुग्णांचा मृत्यू हट्टी मोदी सरकार वैज्ञानिकांचे सल्ले देखील ऐकत नाहीत | डॉ. जमील यांचा कोरोना सल्लागार गट प्रमुख पदाचा राजीनामा
x

नवी मुंबई: शिवसैनिकांचा शिवबंधन तोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश

नवी मुंबई : शिवसेना जरी आज केंद्रात आणि राज्यात सत्तेत असली तरी पक्ष नक्की सत्तेत आहे की विरोधी पक्षात हे कार्यकर्त्यांना सुद्धा कळेनासे झाल्याने संभ्रमात असलेले अनेक शिवसैनिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करत आहेत. त्याचाच प्रत्यय नवी मुंबईतील घणसोलीत आला आहे. शिवसेनेच्या अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

सध्या अनेक निवडणूकपूर्व सर्व्हेमध्ये शिवसेनेची भाजपसोबत युती न झाल्यास मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिवसेनेने जरी स्वतंत्र निवडणुका लढविण्याचा निर्णय जाहीर केला असला तरी अखेरच्या क्षणी काय होईल याची शास्वती कार्यकर्ते सुद्धा देऊ शकत नाहीत अशी स्थिती आहे. दरम्यान, आयत्यावेळी पक्ष प्रमुखांनी भूमिका बदलून पुन्हा युतीचा निर्णय जाहीर केल्यास शिवसेनेबद्दलची प्रतिमा अजूनच नकारात्मक होईल, असा अंदाज अनेक राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, घणसोली विभागातील या शेकडो शिवसैनिकांच्या मनसेतील पक्ष प्रवेशावेळी मनसे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे, उपशहर अध्यक्ष संदीप गलगूडे, शहर सचिव सचिन आचरे व घणसोली विभागातील सर्व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(664)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x