23 April 2025 5:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | शेअर प्राईस 90 रुपये; तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NHPC Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER Tata Technologies Share Price | टाटा तिथे नो घाटा, गुंतवणूकदारांकडून जोरदार खरेदी, मोठी संधी आली - NSE: TATATECH RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर घसरतोय, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला, गुंतवणूकदारांसाठी मोठी अपडेट - NSE: YESBANK NTPC Green Energy Share Price | पीएसयू शेअर देऊ शकतो मोठा परतावा, या कंपनीला मोठा भविष्यकाळ - NSE: NTPCGREEN
x

राज ठाकरे यांनी घेतली शहीद जवान सुनील ढोपे यांच्या कुटुंबीयांची भेट

कारंजा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर असून पक्ष विस्तारासोबत ते अनेक समाजसेवी संस्था तसेच स्थानिक नागरिकांच्या समस्या समजून घेण्यावर सुद्धा भर देत आहेत. दरम्यान, काल त्यांनी शहीद जवान सुनील विठ्ठलराव ढोपे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच ढोपे कुटुंबियांच्या व्यथा जाणून घेतल्या.

कारंजा येथील जवान सुनील विठ्ठलराव ढोपे यांचा सिमा सुरक्षा दलात मेघालय राज्यातील शिलाॅंग येथे कर्तव्य बजावत असतांना १५ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला होता. त्यांनी मृत्यूपूर्वी आपल्या भावाशी संपर्क साधून माझ्या जिवास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून धोका असल्याची माहिती दिली होती. त्यावरून कारंजा तालुक्यातील वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले होते. सदर प्रकरणी सिमा सुरक्षा दलातील ५ जणांवर हत्येचा गुन्हा देखील दाखल झाला आहे. जवान सुनिल ढोपे मृत्यूप्रकरणी न्याय मिळवून देण्यासाठी मदतीचे आश्वासन राज ठाकरे यांनी त्यांच्या कुटुंबियांना दिले आहे.

यावेळी सुनील ढोपे यांचे बंधू ज्ञानेश्वर ढोपे यांनी घडलेला सर्व प्रकार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कानावर घातला. त्यावर या प्रकरणाची सत्यता पडताळून ढोपे कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण मदत करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. दरम्यान, या भेटीवेळी त्यांच्या समवेत पक्षाचे नेते बाळा नांदगावकर, राज्य उपाध्यक्ष राजु उंबरकर आदी नेते उपस्थित होते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या