21 October 2019 4:16 PM
अँप डाउनलोड

राज ठाकरेंची आज संध्याकाळी अमरावतीत प्रकट मुलाखत; भव्य नियोजन

अमरावती : आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे कालपासून १० दिवसांच्या पश्चिम विदर्भ दौ-यासाठी रवाना झाले आहेत. राज ठाकरे यांनी शहरी भागांसोबतच ग्रामीण महाराष्ट्राकडे सुद्धा लक्ष केंद्रित केले असून पक्षविस्तार तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची फळी उभी करणे हे त्यांच्या दौऱ्यामागील मूळ उद्देश असल्याचे समजते. दरम्यान आज ७:३० वाजता पंचवटी चौकातील श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली आहे.

मनसे अध्यक्षांच्या या मुलाखती दरम्यान राज्यभरातील ख्यातनाम व्यंगचित्रकारांना आमंत्रित करण्यात आलं आहे. दरम्यान या मुलाखतीची जय्यत तयारी करण्यात आली असून सुमारे १५,००० लोकं बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच भव्य आकर्षक मंच, एलईडी वॉल आणि हाय डिजिटल साउंडची व्यवस्था करण्यात आली आहे. मागील ४ वर्षांपूर्वी सायन्सकोर मैदानावर आयोजित सभेत रेकॉर्डब्रेक पाहायला मिळाली होती. परंतु आज संध्याकाळी सभा नसली तरी आयोजित मुलाखतीचे नियोजन हे सभेला लाजविणारे असेल असं स्थानिक राजकीय विश्लेषकांना वाटतं आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांची ही प्रकट मुलाखत ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे आणि निवेदिका रेणुका देशकर हे संयुक्तपणे घेणार आहेत असं वृत्त आहे. अंबा फेस्टिवल ट्रस्टच्या वतीने हे सर्व आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे मनसेच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना यातुन बळ मिळून ते मोठ्या ताकदीने पक्ष प्रचारात उतरतील असं स्थानिक राजकीय विश्लेषकांनी मत व्यक्त केलं आहे.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(451)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या