28 June 2022 12:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
नागपूर-बुटीबोरी मार्गावर 6 पदरी उड्डाणपूल | 15 मिनिटांत 19 किमीचं अंतर कापता येईल - नितीन गडकरी एकनाथ शिंदेंनी बंडखोर आमदारांना या 'गेम प्लॅन' पासून ठेवलंय अंधारात | शिंदे आणि भाजपचा गेम प्लॅन बाहेर येतोय Multibagger Penny Stocks | हा 3 रुपयांचा पेनी शेअर करतोय मालामाल | आजही खरेदीला खूप स्वस्त Inflation Effect | पीठानंतर आता तांदूळ अजून महागणार आहे | तुमच्या किचनचा खर्च वाढणार Multibagger Stocks | तुम्ही सुद्धा असे शेअर निवडा | या शेअरने फक्त 10 महिन्यात 960 टक्के परतावा दिला Demat Deactivated | तुमचे डीमॅट खाते डिऍक्टिव्हेट होईल | फक्त 3 दिवस उरले | हे काम लवकर करा PPF Investment | मुलाच्या नावेही उघडता येईल पीपीएफ खाते | फायद्याच्या योजनेबद्दल जाणून घ्या
x

अयोध्यावारीसाठी शुभेच्छा, जय श्रीराम! पण या प्रश्नांची उत्तर द्या? मनसे

मुंबई : शिवसेना भवनाबाहेर मनसेने उद्धव ठाकरेंना पोस्टरबाजीने शुभेच्छा दिल्या आहेत. परंतु त्यासोबत १० प्रश्न सुद्धा विचारले आहेत आणि शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्नं केला आहे. दसरा मेळाव्यात शिवसेना पक्ष प्रमुखांनी २५ नोव्हेंबर रोजी अयोध्येला जाण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर त्यांच्यावर अनेक बाजूने टीका सुद्धा करण्यात येत आहे. त्याचाच फायदा मनसे सुद्धा उचलत आहे.

सामान्य माणसं भाजप आणि शिवसेनेच्या राजवटीत ज्या मूळ समस्यांनी होरपळून निघाली आहेत, त्याचाच धागा पकडत मनसेने शिवसेनेला लक्ष केलं आहे. त्यात मध्ये प्रश्न विचारताना म्हटलं आहे की, या अयोध्या वारीने महाराष्ट्राचे रस्ते खड्डे मुक्त होणार का ?, महागाई कमी होणार का ?, शेती मालाला भाव मिळणार का ? महाराष्ट्रातील महिला सुरक्षित होणार का? बेरोजगारांना रोजगार मिळणार का? महाराष्ट्रातला दुष्काळ संपणार का? महापालिकेतील भ्रष्टाचार संपणार का? आणि खिशातले राजीनामे बाहेर पडणार का ? असे प्रश्न मनसेने बॅनरद्वारे शिवसेना भवनाच्या समोर लावले आहेत.

त्यामुळे स्थानिक नागरिकांचे आणि पादचाऱ्यांचा नजर अगदी सहज त्या बँनरवर पडत आहे आणि लोकांना हसू फुटत आहे असं चित्र पाहायला मिळालं. त्यामुळे एनडीएच्या राजवटीत सामान्यांना भेडसावणारे प्रश्न महत्वाचे की अयोध्यावाऱ्या असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(714)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x