महत्वाच्या बातम्या
-
ऑक्सिजन गळती दुर्घटनेच्या १० दिवसांनी नाशिकमध्ये प्रकटलेले, पण चंद्रकांतदादा म्हणाले फडणवीस आणि मी....
कोरोनाच्या संपूर्ण संकटकाळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि माझ्याइतकं काम राज्यातील इतर कोणत्याच नेत्याने केलं नाही, असे वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. आम्ही कोरोनाच्या काळात सतत फिरत आहोत. आमच्या दोघांइतकं कोणताच नेता फिरला नसेल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
4 वर्षांपूर्वी -
राज्याला अधिक मदत द्या असं फडणवीसांकडून मोदींना एकही पत्र नाही, पण सोनिया गांधींना पत्र लिहिण्यास वेळ काढला
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं होतं. देशात आलेल्या करोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीने काही मुद्दे उपस्थित केले होते. यामध्ये सोनिया गांधी यांनी काही लसींच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली जावी असं मत व्यक्त केलं होतं. यावेळी त्यांनी करोनाविरोधातील लढाईत परिणामकारक निकालासाठी लसीला प्राधान्य देण्याच्या धोरणाची गरजही अधोरेखित केली होती.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीसजी सरकार लोकांचे जीव वाचविण्यात व्यस्त, तुम्ही भाजपची माशा मारण्याची स्पर्धा भरवत बसा - राष्ट्रवादी
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती. प्रत्येक गोष्टीत राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवत आहे. राज्यांनी ऊठसूट केंद्राकडे बोट दाखवणं थांबवलं पाहिजे. सर्वच जर केंद्राने करायचं तर राज्यांनी काय माशा मारायच्या का?, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.
4 वर्षांपूर्वी -
ज्याचं अग्नी दहन व्हायला हवं होतं, त्यांना दफन केलं जातंय, तुम्ही कसले हिंदू रक्षक - काँग्रेस
देशात कोरोनामुळे मृत्यूंचा आकडा २.६२ लाखांच्या वर पोहोचला आहे. दुसरीकडे, सध्या उत्तर प्रदेशातील कानपूर, कन्नौज, उन्नाव, गाझीपूर आणि बलियामधील परिस्थिती अतिशय वाईट आहे आणि इथलं भीषण वास्तव देखील समोर आलं आहे. वास्तवात समोर येणारं चित्र हे अत्यंत भीषण असून योगी सरकार हतबल असल्याचं पाहायला मिळतंय.
4 वर्षांपूर्वी -
हे कुशासनामुळेच भोगतोय हे लोकांना कळतंय | आशा आहे भारतीय अमेरिकन मतदारांपेक्षा जास्त चातुर्य दाखवतील - अर्थतज्ज्ञ कौशिक बसू
कोरोना महामारी येऊन एक वर्षा लोटले आहे. या काळात अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावले आहे, पण यातील अनेकांच्या मृत्यूची सरकारी आकडेवारीत नोंदच झालेली नाही. असे यामुळे, कारण अनेक मोठ्या देशांनी मृतांचा खरा आकडा जगापासून लपवला असल्याचा दावा वॉशिंग्टन यूनिव्हर्सिटीच्या हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्यूएशन इंस्टीट्यूटच्या विश्लेषणात करण्यात आला आहे. यात सांगितल्यानुसार, रशियात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची आकडेवारी सरकारी आकडेवारीपेक्षा 5 पट जास्त आहे.
4 वर्षांपूर्वी -
दिल्लीकरांसाठी देवदूत ठरलेल्या बी श्रीनिवास यांच्याविरोधात क्राईम ब्रांच फेरा | मोदी सरकारविरोधात काँग्रेसचा संताप
दिल्लीची दैनंदिन प्राणवायूची गरज ७०० मेट्रिक टनावरून ५८२ मेट्रिक टनावर आली असल्याने अतिरिक्त प्राणवायू अन्य राज्यांना उपलब्ध करून द्यावा, असे पत्र दिल्ली सरकारने केंद्र सरकारला पाठविले आहे, असे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी गुरुवारी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे गेल्या २४ तासांत १० हजार ४०० जणांना करोनाची लागण झाल्याने शहरातील सकारात्मकतेचे प्रमाण १४ टक्क्यांवर आले आहे, असेही सिसोदिया म्हणाले. सध्या कोविड-१९ रुग्णालयांमध्ये आता अधिक खाटा उपलब्ध आहेत आणि प्राणवायूच्या मागणीतही घट झाली आहे, असे सिसोदिया यांनी आभासी पत्रकार परिषदेत सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
तुमच्या तिथे चहात बिस्किटं बुडत असतील, आमच्याकडे चहातंच पूर्ण देश बुडाला - काँग्रेस
देशातील कोरोना संक्रमितांचा आकडा कमी होताना दिसत आहे. गुरुवारी देशभरात 3 लाख 42 हजार 896 कोरोना संक्रमित आढळले, तर 3 लाख 44 हजार 570 रुग्णांनी कोरोनावर मात केली. तसेच, 3,997 रुग्णांचा मृत्यू झाला. या महिन्यात तिसऱ्यांदा ठीक होणाऱ्या रुग्णांचा आकडा नवीन संक्रमितांपेक्षा जास्त आहे. 4 दिवसापूर्वी, 10 मे रोजी 3.29 लाख नवीन रुग्ण आढळले होते, तर 3.55 लाख संक्रमित ठीक झाले होते.
4 वर्षांपूर्वी -
प्रभू श्रीरामाच्या अयोध्येत ऑक्सिजन अभावी लोक मरत आहेत, पंतप्रधान, गृहमंत्री गायब - संजय राऊत
कोरोना आपत्तीत भारत देश सध्या रामभरोसे असल्याची टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसंच विरोधकांकडून महाराष्ट्राची बदनामी करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करताना देशात सर्वाधिक चांगलं काम महाराष्ट्राने केलं असल्याचंही ते म्हणाले आहेत. अहंकार आणि राजकारण बाजूला ठेवून जर चर्चा केली तर देशातील परिस्थिती सुधारु शकते असा सल्लाही संजय राऊतांनी दिला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
'दो मई, दीदी गई' म्हणणारे नेते निकालानंतर 'किधर गई'? | अमित शहा बेपत्ता झाल्याबाबतची पोलिसात तक्रार
काँगेसच्या नॅशनल स्टुड्येंट यूनियन ऑफ इंडियाने बुधवारी दिल्लीच्या पोलीस ठाण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बेपत्ता असल्याची तक्रार केली आहे. एनएसयूआयचे राष्ट्रीय महासचिव नागेश करियप्पा यांनी अमित अनिलचंद्र शहा बेपत्ता होण्याची तक्रार पोलीस ठाण्यात देताना म्हटलंय की, संपूर्ण देश कोरोनाच्या महामारीने त्रस्त आहे आणि देशातील नागरिक या महामारीच्या संकटात अडकला आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आणि मोदी सरकारमध्ये एक साम्य आहे, दोघांना पॅझिटिव्ह लोकं आवडतात ... कोणी केली टीका?
देशात कोरोना रुग्णांमध्ये मागील 24 तासात पुन्हा वाढ झाली. बुधवारी 3 लाख 62 हजार 389 नवीन रुग्ण सापडले, तर 3 लाख 51 हजार 740 रुग्णांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, बुधवारी 4,127 रुग्णांचा मृत्यू झाला. चार हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू होण्याचा हा सलग दुसरा दिवस आहे. देशात या महामारीच्या विळख्यात आतापर्यंत 2.37 कोटी लोक आले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
महागाईने जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला, लोकांना जगण्यापेक्षा मरण स्वस्त वाटू लागलंय - राष्ट्रवादीचं आंदोलन
देशातील 5 राज्यातील निवडणुका संपताच पेट्रोल-डीझेलच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, पेट्रोलमध्ये वाढ होऊन तो शंभरीच्या जवळ आला आहे. विशेष म्हणजे राजस्थान आणि मध्य प्रदेशात इंधनाच्या किंमतीने शंभरी पार केली आहे. याचे पडसाद महाराष्ट्र राज्यातही पडले असून राज्यात सर्वात महाग पेट्रोलची नोंद परभणीत झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात ‘नमामि गंगे’ ऐवजी ‘शवामी गंगे’ असं झालं आहे | काँग्रेस खा. धानोरकरांचं टीकास्त्र
देशात कोरोना रुग्णांमध्ये मागील 24 तासात पुन्हा वाढ झाली. बुधवारी 3 लाख 62 हजार 389 नवीन रुग्ण सापडले, तर 3 लाख 51 हजार 740 रुग्णांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, बुधवारी 4,127 रुग्णांचा मृत्यू झाला. चार हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू होण्याचा हा सलग दुसरा दिवस आहे. देशात या महामारीच्या विळख्यात आतापर्यंत 2.37 कोटी लोक आले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
सोशल मिडीयासाठी खर्च आणि यंत्रणा नको | सोशल मीडियासाठी 6 कोटी खर्च करण्याचा निर्णय रद्द
उपमुख्यमंत्री कार्यालयाचा सोशल मिडीया सांभाळण्यासाठी बाह्ययंत्रणा नियुक्त करण्याची बिलकूल गरज नाही, यासंदर्भातील शासननिर्णय तात्काळ रद्द करावा, असे निर्देश “उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (१३ मे) दिले आहेत. उपमुख्यमंत्री कार्यालयाला समाजमाध्यमांवर स्वतंत्रपणे कार्यरत राहण्याची गरज वाटत नाही.
4 वर्षांपूर्वी -
केंद्र सरकार नक्कीच कमी पडतंय, स्वत:ची प्रतिमा निर्मिती करण्यापेक्षा लोकांचा जीव वाचवा, अनुपम खेर यांनी झापलं
बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर हे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचे कट्टर समर्थक आणि मोदी भक्त समजले जातात. मात्र आता देशातील कोरोनाच्या भीषण परिस्थितीवरुन त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. सरकार कुठे न कुठे कमी पडलं असून स्वत:ची प्रतिमा निर्मिती करण्यापेक्षा लोकांचा जीव वाचवणं हे महत्वाचं आहे अशा प्रकारची टीका अभिनेते अनुपम खेर यांनी केली आहे. अभिनेता अनुपम खेर यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हे मत व्यक्त केलंय.
4 वर्षांपूर्वी -
उपमुख्यमंत्र्यांच्या सोशल मीडियावर ६ कोटी खर्चाची योजना | तर मोदी सरकारचा २०२० मध्ये ७१३ कोटीचा मार्केटिंग विक्रम
राज्य सरकारने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोशल मीडियावर तब्बल ६ कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. सामान्य प्रशासन विभागाने काल यासंदर्भातील आदेश जारी केले आहे. या आदेशात अजित पवार यांची सोशल मीडियावरील खाती सांभाळण्यासाठी आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एखादी बाहेरची कंपनी नियुक्त करण्यात येणार आहे. ही कंपनी अजित पवार यांचे ट्विटर, फेसबुक, ब्लॉगर, यूट्युब आणि इन्स्टाग्राम खात्याचे काम बघेल.
4 वर्षांपूर्वी -
सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचा पैसा लस आणि ऑक्सिजन खरेदीसाठी वापरा | १२ विरोधी पक्षांच मोदींना पत्र
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे नवे संकट उभे ठाकले आहे. या स्थितीत केंद्र सरकारने मोफत लसीकरण मोहीम राबवावी, सेंट्रल व्हिस्टासारख्या प्रकल्पासाठी खर्च केली जात असलेली रक्कम हे काम थांबवून आरोग्य क्षेत्रासाठी वापरावी, बेरोजगारांना मासिक ६ हजार रुपये द्यावेत, अशा एकूण ९ मागण्यांचे खुले पत्र १२ विरोधी पक्षांनी पंतप्रधानांना लिहिले आहे.
4 वर्षांपूर्वी -
भातखळकरांचं अतुलनीय ट्विट | लस उत्पादनावरून मोदींना मानाचा मुजरा | प्रतिदिन ४ हजार मृत्यूंचा विसर?
देशात कोरोना रुग्णांमध्ये मागील 24 तासात पुन्हा वाढ झाली. बुधवारी 3 लाख 62 हजार 389 नवीन रुग्ण सापडले, तर 3 लाख 51 हजार 740 रुग्णांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, बुधवारी 4,127 रुग्णांचा मृत्यू झाला. चार हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू होण्याचा हा सलग दुसरा दिवस आहे. देशात या महामारीच्या विळख्यात आतापर्यंत 2.37 कोटी लोक आले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
पेट्रोल दरवाढ | जनतेच्या खिशात काही टाकता येत नसेल तर निदान जे काही ते तरी काढून घेऊ नका - शिवसेना
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने आधी इंधन दरकपातीचा ‘चमत्कार’ आणि निवडणुकीनंतर दरवाढीचा ‘नमस्कार’ जनतेला पुन्हा अनुभवायला मिळत आहे. पाच राज्यांतील निवडणुकांचा धुरळा खाली बसला आणि पेट्रोल–डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला. ज्यांच्याकडे थोडेफार आहे ते पेट्रोल-डिझेलला शंभरी पार करून काढून घ्यायचे आहे का? जनतेच्या खिशात काही टाकता येत नसेल तर निदान जे काही शिल्लक आहे, ते काढून तरी घेऊ नका, असा सल्ला शिवसेनेनं केंद्र सरकारला दिला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात इंधन दरवाढ आणि निवडणुकांवर भाष्य करण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्याला अधिक लस किंवा इतर कोरोनासंबंधित साहित्य द्या असे एक तरी निवेदन फडणवीसांनी मोदींकडे दिले का? - बच्चू कडू
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या भूमिका बजावायला पाहिजे होत्या, त्या त्यांनी बजावल्याच नाही. त्यामुळे आज जी आपत्ती आली आहे ती देशासोबत राज्यावर येऊन पडली आहे. देशात जर योग्य नियोजन झाले असते तर आज हे दिवस आपल्याला पाहायला मिळाले नसते,” असा जोरदार हल्लाबोल राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला.
4 वर्षांपूर्वी -
त्या काळात पोर्टल, ऍप असलं काही नसताना २० कोटी बालकांचे पोलीओ लसीकरण केले होते - नाना पटोले
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केंद्रातील मोदी सरकारवर थेट हल्लाबोल केलाय. केंद्रातील मोदी सरकार कोविड परिस्थिती हाताळण्यात पूर्णत: अपयशी ठरले आहे. केंद्र सरकारच्या गलथानपणामुळे लसीकरण मोहीमही फसलीय, असंही नाना पटोले म्हणालेत. देशभरात लसीकरण केंद्राबाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. 17 कोटी जनतेला लस दिल्याचे मोदी सरकार सांगते, पण लाखो लोकांची दुसऱ्या डोसची कालमर्यादा उलटून गेली तरी अजून त्यांना दुसरा डोस मिळत नाही.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL