मुंबई : मुंबई आयआयटी’च्या विद्यार्थ्यांचा संपूर्ण जगभरात डंका आहे. तसेच भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रात आयआयटीचा मोठा वाटा आहे. भारतातून विद्यार्थी शिक्षण पूर्ण करून जगभरात भारताचे नाव उंचावत आहेत. त्यामुळे मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज आयआयटी विद्यार्थ्यांबाबत गौरोद्गार काढले. दरम्यान, पायाभूत सुविधांसाठी मुंबई आयआयटीला एक हजार कोटींचा निधी देणार असल्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे;
१. आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांचा जगभरात डंका आहे.
२. इथून शिक्षण घेऊन विद्यार्थी संपूर्ण जगात भारताचे नाव उंचावत आहेत. त्यामुळे अशा सर्वांचे मी अभिनंदन करतो.
३. देशाच्या विकासात ते सक्रिय योगदान देत आहेत.
४. आयआयटी क्षेत्रासाठी एक हजार कोटींची आर्थिक मदत मिळणार आहे.
५. येथील विद्यार्थी अमेरिकेत जातात, त्यांच्याकडून देशाच्या नावाचा गौरव केला जातो. त्यामुळे जगभरात भारताच्या नावाची प्रशंसा होत आहे.
६. सध्या आयटी विकासाचा मुख्य भाग बनत चालला आहे.
७. मागील 4 वर्षांपासूनचा अनुभव महत्वाचा आहे.
८. आपली शिक्षण यंत्रणा चांगल्या पद्धतीची आहे.
९. आयआयटी मुंबई देशातील या नव्या तंत्रज्ञानाच्या दृष्टीने महत्वपूर्ण काम करणाऱ्या संस्थांपैकी एक संस्था आहे.
१०. काही काळानंतर ज्या इमारतीचे उद्घाटन होईल, या इमारतीमध्ये विविध शाखांचे अभ्यासक्रम घेण्यात येतील.
११. यासाठी आवश्यक वातावरणाची स्थापना करण्यात येणार आहे.
१२. यामध्ये सोलर एनर्जीची स्थापना करण्यात येणार आहे.
१३. आयआयटी आता ‘इंडिया इन्स्ट्रूमेंट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन’ बनत चालला आहे.
१४. आज जगभरात कितीही कोट्यवधी स्टार्टअप् असो त्यांना आयआयटीतून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी विकसित केले आहे.
१५. आज भारत स्टार्टअप क्षेत्रात दुसऱ्या क्रमांकाचा देश बनत आहे.
 
						 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		