5 February 2023 10:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ration Card Updates | रेशनकार्डमध्ये नव्या सदस्याचे नाव जोडायचयं, महत्वाची अपडेट, आत्ताच ही काळजी घ्या LIC Share Price | हिंडेनबर्गमुळे अदानी ग्रुप हादरला, एलआयसी शेअर्सला सुद्धा मोठा फटका बसणार? तुमचे पैसे बुडणार? Gold ETF Investment | गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक, मिळतील अनेक फायदे आणि वेगाने संपत्ती वाढेल Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे दर जबरदस्त कोसळले, रविवारी खरेदीपूर्वी तुमच्या शहरातील आजचे नवे दर पहा My Salary Slip | पगारदार व्यक्ती आहात? तुमच्या पगाराच्या स्लिपमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश असतो माहिती आहे? लक्षात ठेवा Vodafone Idea Share Price | भारत सरकार 'व्होडाफोन आयडिया' मध्ये सर्वात मोठी गुंतवणुकदार, शेअरचं पुढे काय होणार? Horoscope Today | 05 फेब्रुवारी 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

जातनिहाय आरक्षण बदलण्याचा सरकारचा कोणताही हेतू नाही: पंतप्रधान

नवी दिल्ली : देशभर अनेक महिन्यांपासून आरक्षणाच्या मुद्यावर रान उठले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीत मोदींनी आरक्षण, एनआरसी आणि जमावाकडून होणाऱ्या मारहाणीच्या घटना अशा विविध प्रश्नांना जाहीर प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान आरक्षणाच्या प्रश्नाला उत्तर देताना नरेंद्र मोदी म्हणाले की,’जातनिहाय आरक्षण बदलण्याचा सरकारचा कोणताही हेतू नाही’, त्यामुळे याबाबत कोणीही मनात शंका ठेऊ नये. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची स्वप्ने हीच देशाची ताकद असून, सबका साथ, सबका विकास या आमच्या उद्देशानुसार आंबेडकरांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आमचं सरकार कटीबद्ध असल्याचं मोदी म्हणाले. देशातील गरीब, पीडित, मागास, आदिवासी, दलित तसेच ओबीसी समाजाचे हित जपणे आमच्या सरकारसाठी गरजेचे आहे असं मत मोदी यांनी व्यक्त केलं.

तसेच एनआरसीच्या मुद्द्यावरुन कोणत्याही भारतीयाला आपला देश सोडावा लागणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. तसेच देशात सध्या जमावाकडून मारहाणीच्या ज्या घटना घडत आहेत, परंतु त्या देशासाठी अत्यंत दुर्देवी आहेत. यामुद्यावरून कोणीही राजकारण करु नये, तसेच सर्वांनी मिळून राजकारणाच्या पलिकडे जाऊन समाजात शांतता निर्माण करणे आवश्यक आहे. देशातील अशा मारहाणीच्या घटनांचे समर्थन कधीच होऊ शकत नाही, अशा स्पष्ट शब्दांत मोदींनी त्यांची भुमिका एएनआय’च्या मुलाखतीत स्पष्ट केली आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1662)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x