देहरादून : भारताची अर्थव्यवस्था मागील काही वर्षांपासून अत्यंत स्थिर असून आर्थिक तूट सुद्धा कमी झाली आहे. दरम्यान, महागाई नियंत्रणात असून देशातील मध्यमवर्गीयांची आर्थिक स्थिती सुधारत असल्याच पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी उपस्थितांसमोर बोलताना म्हणाले. भारत सध्या महत्वाच्या सामाजिक तसेच आर्थिक बदलातून जात आहे. परंतु, त्या बदलातून निर्माण झालेला नवा भारत हा जागतिक विकासासाठी उत्प्रेरक ठरेल, असे भाकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणादरम्यान केले. उत्तराखंड इव्हेस्टर्स समिटमध्ये रविवारी मोदी उपस्थितांना संबोधित करत होते.
पुढे मोदी ते म्हणाले की , देशात नव्याने वापरण्यात येणाऱ्या ऊर्जा क्षेत्रासाठी भारत जागतिक नेतृत्वाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. दरम्यान, २०३० पर्यंत भारतातील एकूण ४० टक्के ऊर्जा ही बिगर जीवाश्म इंधन स्त्रोतापासून तयार केली जाईल, असे आम्ही ठरविले आहे. जगातील प्रत्येक महत्वाच्या संस्थांनी असे भाकीत केले आहे की, आगामी दशकांमध्ये भारत जागतिक विस्तारामध्ये इंजिन म्हणून कार्य करेल. देशाची अर्थव्यवस्था मागील काही वर्षांपासून स्थिर असून आर्थिक तूट सुद्धा कमी झाली आहे. तसेच महागाई पूर्ण नियंत्रणात असून देशातील मध्यमवर्गाची स्थिती सुधारत आहे.
उत्तराखंड राज्याकडे सेंद्रीय राज्य म्हणून विकसित होण्यास मोठा वाव आहे. त्यासाठी जे कार्य सुरु करण्यात आले आहे ते क्लस्टर बेस्ड सेंद्रिय शेती असे आहे. उत्तराखंडमध्ये निसर्ग, थरार, संस्कृती, योग तसेच ध्यान अशा सर्व गोष्टी उपलब्ध आहेत. त्यामुळे उत्तराखंड टुरिझम हे संपूर्ण पॅकेज आणि आदर्श ठिकाण असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले. तसेच, ‘मेक इन इंडिया’ हे केवळ भारतासाठी नसून ती जागतिक मोहिम संपूर्ण जगासाठी असल्याचे यावेळी मोदींनी उपस्थित गुंतवणूकदारांसमोर बोलताना सांगितले. या २ दिवसीय समिटमध्ये जपान, चेक रिपब्लिक, अर्जेटिना, मॉरिशस आणि नेपाळ देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
Come and invest in Uttarakhand. Addressing the investment summit in Dehradun. https://t.co/ZbdLt4Akg8
— Narendra Modi (@narendramodi) October 7, 2018
