नवी दिल्ली: देशाच्या संरक्षण आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या राफेल लढाऊ विमानांच्या कराराबाबतचा कॅगचा अहवाल अखेर आज अधिकृतपणे वरिष्ठ सभागृह म्हणजे राज्यसभेत सादर करण्यात आला आहे. सध्याच्या भाजप प्रणित एनडीए सरकारने केलेला राफेल लढाऊ विमानांचा करार हा आधीच्या काँग्रेस प्रणित यूपीए सरकारने केलेल्या करारापेक्षा 2.86 टक्क्यांनी स्वस्त असल्याचे कॅगने आपल्या अहवालात नमूद केले आहे. तसेच मोदी सरकारने १२६ विमानांच्या तुलनेत ३६ विमानांसाठी करार करताना एकूण १७.०८ टक्के पैसे वाचवले आहेत, असं म्हटल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

त्यामुळेच, बचावात्मक अहवाल सादर होण्याची शंका आल्याने, कॅगचा अहवाल सादर होण्यापूर्वीच काँग्रेसने त्यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. १४१ पानांचा कॅगचा अहवाल राज्यसभेत सादर झाल्यानंतर विरोधकांनी गोंधळ प्रचंड गोंधळ घालण्यास सुरुवात केली. दरम्यान, राज्यसभेचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत स्थगित करावे लागले. तर लोकसभेमध्ये TDP आणि ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी मोठा गोंधळ घातल्याने कामकाज स्थगित करावे लागले.

मात्र, संपूर्णपणे तयार झालेल्या राफेल लढाऊ विमानांची किंमत काँग्रेस प्रणित UPA सरकारने केलेल्या करारातील विमानां एवढीच असेल असं सांगण्यात आलं आहे. पण धक्कादायक म्हणजे, राफेल लढाऊ विमानांची प्रत्यक्ष किंमतच सांगण्यात आलेली नाही. त्यात भर म्हणजे आज सादर झालेल्या कॅगच्या अहवालामुळे यूपीएच्या तुलनेत एनडीएने खरेदी केलेली राफेल विमाने ९ टक्क्यांनी स्वस्त मिळाल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दावा देखील खोटा ठरला आहे.

rafale fighter jet deal finally cag report submitted rajya sabha nda contract 2 pint 86 percent cheaper upa