11 August 2020 9:06 PM
अँप डाउनलोड

दिवाळीचं औचित्य साधून मी व्यंगचित्रांची एक मालिका घेऊन येत आहे: राज ठाकरे

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि व्यंगचित्रकार राज ठाकरे या दिवाळीत व्यंगचित्रांची एक मालिकाच घेऊन येत आहेत. राज ठाकरे यांनीच स्वतः त्याबाबतची अधिकृत माहिती त्यांच्या फेसबुक पेजवर प्रसिद्ध केली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

समाज माध्यमांवरून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतानाच त्यांनी याबाबतची घोषणा केली आहे. “दिवाळीचं औचित्य साधून मी व्यंगचित्रांची एक मालिका घेऊन येत आहे. ती तुम्हाला आवडेल अशी आशा”, असे त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर म्हटले आहे. राज ठाकरेंची व्यंगचित्रे आणि त्यातून सध्याच्या परिस्थितीवर होणारे राजकीय प्रहार समाज माध्यमांवर धुमाकूळ घालत आहेत. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा नेहमीच केंद्रस्थानी राहिले आहेत. परंतु आता अन्य मुद्यांवर अन्य राजकीय नेत्यांवर व्यंगचित्रातून प्रहार झाल्यास नवल वाटायला नको.

नेमकी काय पोस्ट केली आहे राज ठाकरे यांनी?

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(633)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x