नवी दिल्ली : भारतीय वायुदलाने पाकिस्तानमध्ये केलेल्या एअर स्ट्राईक’नंतर संपूर्ण वातावरण ढवळून निघाले आहे. पुलवामानंतरच्या घडामोडींना आणखी एक रुपेरी किनार होती. ‘मागच्या सरकारांबद्दल’ आणि त्यांच्या सुरक्षाविषयक अपयशांबद्दल ‘अधिकृत सूत्रांकडून’ आडून-आडून वार केले गेले तरी विरोधी पक्षांनी या कसोटीच्या काळात आपला प्रतिसाद संयत ठेवला.
सरकार पक्ष आणि विरोधी पक्ष यांचे ताणलेले संबंध लक्षात घेता ही एक मोठीच गोष्ट होती. पुलवामासंबंधी अगदी थेट असे कळीचे प्रश्न सुद्धा विरोधी पक्षांनी काही काळ लांबणीवर टाकले. त्यात विरोधी पक्षांचे राजकीय शहाणपण असेलही, पण राष्ट्रहिताला केव्हा प्राधान्य द्यायचे, याचे तारतम्यदेखील त्यातून व्यक्त झाले. आता सुरक्षेच्या नावाने राज्यात फडणवीस सरकार संवेदलशीलता दाखविण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळण्याच्या तयारीत आहेत. तर दुसरीकडे देशाचे पंतप्रधान पक्ष विस्तारासाठी आणि कार्यकर्त्यांचा बूथ मेळावे घेणार आहे. पक्ष एकच असला तरी दोन्ही गोष्टीत भिन्नता दिसत आहे.
देशाला आणि विरोधी पक्षांना देशभक्तीचे डोस पाजताना सत्ताधारांचे राजकीय आखाडे, निवडणुकीचा प्रचार असं सर्व काही सुरळीत सुरु आहे. पण हो! तुमही त्यांना त्यांच्या संवेदनशीलतेबद्दल विचारलं तर कदाचित दहशदवादी किंवा पाकिस्तानी ठरवले जाल अशी शक्यता आहे. त्यामुळे सर्व जण मूग गिळून शांत आहेत.
