13 December 2024 2:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

KPI Green Energy Share Price | KPI ग्रीन शेअरने 1 वर्षात दिला 230% परतावा, कंपनीला मोठी ऑर्डर मिळताच खरेदी वाढली

KPI Green Energy Share Price

KPI Green Energy Share Price | केपीआय ग्रीन एनर्जी या पॉवर सेगमेंटमधील कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत वाढ पहायला मिळत आहे. केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या उपकंपनीला सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याची एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. या बातमीनंतर केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर तेजीत वाढू लागले.

मागील एका वर्षात केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे 3 पट वाढवले आहेत. शनिवार दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी शेअर बाजाराच्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स 1.87 टक्के वाढीसह 1,433 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीने निवेदन जाहीर करून माहिती दिली की, त्यांची पूर्ण मालकीची उपकंपनी KPIG Energia ला 5.6 MW क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी नवीन कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले आहे. या कंपनीला हे प्रकल्प आर्थिक वर्ष 2024-25 संपण्यापूर्वी पूर्ण करायचे आहे.

केपीआय ग्रीन एनर्जी कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना मागील अनेक वर्षापासून सतत लाभांश वाटप करत आहे. मागील एका महिन्यात केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 12 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 72 टक्के वाढली आहे.

मागील एका वर्षात केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 230 टक्के परतावा कमावून दिला आहे. एका वर्षभरापूर्वी केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर 430 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना तीन वेळा लाभांश वाटप केला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | KPI Green Energy Share Price NSE Live 22 January 2024.

हॅशटॅग्स

KPI Green Energy Share Price(19)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x