मुंबई : शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर काँग्रेसच्या वाटेवर असून त्याची माहिती ‘मातोश्री’वरही आहे आणि मी स्वतः हे स्टॅम्प पेपरवर लिहून देतो असा धक्कादायक व खात्रीशीर दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेव दानवेंनी केला आहे. जालन्यामधील शिवसेनेत खोतकर जे करत आहेत त्याची माहिती मातोश्री वर असल्यानेच खोतकरांना मातोश्रीवर भेटीसाठी ३-४ तास वाट बघावी लागते असं सुद्धा ते म्हणाले.

शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर यांच्या जालना काँग्रेसमधील काही लोकांसोबत बैठका वर बैठका सुरु असून याबाबत सर्व माहिती ‘मातोश्री’वरही आहे असं दानवेंनी आत्मविश्वासाने सांगितलं. आपण जालना शिवसेनेतील सत्य परिस्थिती सांगत आहोत, त्यामुळे खोतकर काँग्रेसमध्ये जाणार हे मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो असं त्यांनी खात्रीलायक सांगितलं आहे.

शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर म्हणजे जालन्याचे लालू प्रसाद यादव आहेत असा दावा सुद्धा दानवेंनी केला आहे. खोतकरांचं पक्ष नेतृत्वाकडे इतकंही वजन नाही की ते कोणाला मातोश्रीवर जाण्यापासून रोखू शकतील असा दावाही रावसाहेब दानवेंनी केला.

मी खात्रीशीर सांगतो की शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर स्वतःच जालन्यातील शिवसेना संपवायला निघाले आहेत आणि काँग्रेसमधील अनेक वरिष्ठांसोबत त्यांच्या बैठका सध्या सुरु आहेत अशी माहिती रावसाहेब दानवे यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे. येत्या काही काळातच मी काय सांगतो आहे ते सिद्ध होईल आणि मग सर्वांना खात्री पटेल की नक्की शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर यांच्या गोटात काय सुरु होत.

रावसाहेब दानवेंनी एवढ्या खात्रीशीर केलेला दावा जर भविष्यात खरा ठरला तर शिवसेनेबद्दल आधीच काही राजकीय विश्लेषकांनी वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे अनेक राजकीय भूकंप होतील अशी शक्यता आहे.

Shiv Senas state minister could enter in congress says Rao saheb Danave