मुंबई : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या एक दिवस आधी मुख्यमंत्र्यांनी आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत घेतलेल्या निर्णयाने शिवसेनेला खुश करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच पुणेकरांना सुद्धा विशेष शैक्षणिक भेट दिली आहे. कारण आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय निश्चित करण्यात आले.
त्यानुसार बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी मुंबई महापौर निवासाची जागा निश्चित करण्यात आली, तसेच महापौरांचे निवासस्थान राणीच्या बागेत वर्ग करण्यात आला आहे. तसेच स्मारकाच्या कामासाठी एकूण शंभर कोटींचा निधी एमएमआरडीएमार्फत उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे आजची कॅबिनेट बैठक शिवसेनेला खुश करण्यासाठी होती का असा प्रश्न विरोधक उपस्थित करत आहेत.
दरम्यान, पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज या स्वायत्त संस्थेला फर्ग्युसन युनिव्हर्सिटी म्हणून मान्यता देण्याचा निर्णय सुद्धा कॅबिनेटने घेतला आहे आणि सदर निर्णय शिक्षण क्षेत्रात मोठा बदल घडवू शकतो असं म्हटलं जात आहे.
आजचे राज्य मंत्रिमंडळाचे कॅबिनेटमधील महत्वाचे निर्णय
- दिव्यांग व्यक्तींच्या स्वावलंबनासाठी हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन व्हेईकल) मोफत उपलब्ध करण्याचा निर्णय.
- बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी १०० कोटींचा निधी एमएमआरडीएमार्फत उपलब्ध करण्यास मंजुरी.
- मुंबई शहरातील सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी केंद्र शासन पुरस्कृत महिला सुरक्षितता पुढाकार योजना राबविण्यास मान्यता.
- पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज या स्वायत्त संस्थेचे रुपांतर फर्ग्युसन युनिव्हर्सिटीमध्ये करण्यास मान्यता.
#मंत्रिमंडळनिर्णय#MaharashtraCabinet
शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे
यांना महाराष्ट्राचे अभिवादन pic.twitter.com/rLl67cvJZo— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 22, 2019
 
						 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		