17 May 2024 4:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील Adani Power Share Price | खुशखबर! अदानी पॉवर शेअरने व्हॉल्युमसह ब्रेकआउट तोडल्यास मालामाल करणार
x

मनसे लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार, चाचपणी सुरू : सविस्तर

मुंबई : महिन्याभरावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीत मनसे उतरणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यासाठी मनसेकडून आकड्यांची चाचपणी सुरु झाली आहे. त्यानुसार २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत म्हणजे मोदी लाटेत सुद्धा पक्षाला मतदाराने ज्या लोकसभा मतदारसंघात चांगला प्रतिसाद दिला होता, त्याची आकडेवारी समोर ठेऊन मतदारसंघ निश्चिती होणार आहेत. त्यामुळे मोदी लाटेत मिळालेला प्रतिसाद, मतदारसंघ आणि उमेदवार या सगळ्याचा अभ्यास आधीच युद्धपातळीवर सुरु होता असे वृत्त आहे.

दरम्यान मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, सध्या आमची टीम सर्व आढावा घेत आहे आणि मोदी लाटेत सुद्धा चांगली मतं मिळालेल्या लोकसभा मतदारसंघात आम्ही आमचे उमेदवार पूर्ण ताकदीनिशी उतरवण्याच्या तयारीत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच मतदारसंघ आणि उमेदवारी निश्चित झाल्यावर संपूर्ण पक्ष ताकदीनिशी उमेदवारांच्या मागे ठाम पणे उभा राहून त्या मतदारसंघाचा प्रत्येक कोपरा पिंजून काढेल अशी रणनीती असेल.

मिळालेल्या माहिती नुसार मनसे ७ ते ८ लोकसभा मतदारसंघ निश्चित करेल जे जिंकायचेच आहेत. तसेच या निवडलेल्या ७-८ जागांवर महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते, सरचिटणीस, उपाध्यक्ष ठाण मांडून बसतील आणि महिला शक्तीचं विशेष पाठबळ सर्वत्र नियोजनबद्ध वापरलं जाईल असे वृत्त आहे. राज ठाकरेंच्या जास्तीत जास्त सभा या मतदारसंघात आयोजित केल्या जातील आणि सत्ताधाऱ्यांविरुद्ध रान पेटवलं जाईल. त्यासाठी मीडिया मॅनेजमेंट सुद्धा नियोजनबद्ध वापरण्याची रणनीती असेल असं समजतं.

राज ठाकरे स्वतः या सर्व विषयावर लक्ष ठेऊन आहेत, परंतु याची कुठेही वाच्यता करण्यात येत नव्हती. सत्ताधाऱ्यांना आणि विशेष करून शिवसेनेला केवळ विकासाच्या मुद्यावर घेरण्याची योजना आहे. सभे दरम्यान शिवसेनेने कितीही राम मंदिर, हिंदुत्व आणि इतर भावनिक विषयाला हात घातल्यास त्यांना केवळ विकासावर बोला आणि १२ मंत्र्यांनी काय दिवे लावले ते सांगा, असे प्रश्न उपस्थित करून निरुत्तर करण्यात येईल. तर राज ठाकरेंच्या भाषणात महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, शेतकरी कर्ज, दुष्काळ आणि फसव्या सरकारी योजनांचे वाभाडे काढले जातील. तर भारतीय जनता पक्षासाठी विशेष रणनीती आखण्यात येते आहे असं वृत्त आहे.

शिवसेनेच्या सत्ताकाळातील अनुभवातून मराठी माणसाच्या मनात पुन्हा मनसे जागा घेत असून ती शिवसेनेसाठी २०१९ मधील धोक्याची घंटा आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत २ जागा जिंकणाऱ्या पक्षाला सुद्धा दिल्लीत मोठी मागणी असणार आहे आणि त्यासाठी प्रत्येक पक्ष सज्ज झाला आहे.

२०१४ मधील लोकसभा निवडणुकीत कल्याण मतदारसंघातून मनसेचे प्रमोद पाटील यांना मोदी लाटेत सुद्धा १ लाख २२ हजार मतं मिळाली होती आणि विशेष म्हणजे तेव्हा भाजप आणि शिवसेनेची युती सुद्धा होती आणि त्यात स्वतः नरेंद्र मोदींनी कल्याणला येऊन शिंदे पुत्रासाठी सभा घेतली होती. त्यामुळे मनसेकडून ईशान्य मुंबई, कल्याण-डोंबिवली, नाशिक आणि विदर्भातील वणी तसेच हिंगणघाट अशा प्रभावी ठरणाऱ्या विधानसभा मतदारसंघाचा समावेश असलेले लोकसभा मतदारसंघ निवडले जातील अशी शक्यता आहे.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x