मुंबई : केंद्रात आणि राज्यात सत्तेत सामील असलेल्या शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी पुन्हा भाजपवर गृहखात्याच्या निष्क्रियतेवरून सामना मुखपत्रातून निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे कोकणातील आमदार दीपक केसरकर यांच्याकडे गृह राज्यमंत्री पद आहे याचा सुद्धा त्यांना विसर पडल्याचे दिसत आहे. गृहखात्याच्या कारभारावर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की,’राज्यात २०१४ पासून पोलिसांवरील हल्ल्यांमध्ये प्रचंड वाढ झाली असून हा गृहखात्याचा पराभव आहे’, असे म्हणत फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
पुढे असं म्हटलं आहे की, पोलीस मार खात आहेत. आणि हे चित्र असेच राहिले तर महाराष्ट्राचा डोलारा कोसळायला वेळ लागणार नाही, अशी टीका केली आहे. तसेच जर महाराष्ट्रात पोलीस सुद्धा सुरक्षित नसतील तर सामान्य जनता सुरक्षित कशी राहील, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
